थंडीच्या दिवसात धुक्यामुळे अनेक दुर्घटना घडण्याची शक्यता असते आणि म्हणूनच या दुर्घटना टाळण्याकरीता ट्रेनच्या इंजिनमध्ये फॉग कटर लाइटचा वापर केला जातो. अनेकदा ट्रेन ड्रायव्हरला लाल सिग्नल न दिसण्याच्या कारणामुळे सुद्धा ट्रेन पुढे जाते यामुळे दुर्घटना घडण्याची शक्यता असते,जसे की गेल्या काही दिवसात बरेली जवळील सीबीगंज स्टेशनचे सिग्नल लाल झाल्यावर सुद्धा ड्रायव्हरचे लक्ष गेले नव्हते आणि किसान एक्सप्रेस ही ट्रेन स्टेशनच्या पुढे निघून गेली होती. अशातच रेल्वेने या समस्येच्या समाधानासाठी एक विशेष डिवाइस तयार केलेले आहे. या डिवाइसच्या सहाय्याने सिग्नल लाल झाल्यावर ट्रेनला आपोआप ब्रेक लागेल आणि ट्रेन जागेवर थांबून जाईल, या कारणामुळे ट्रेन पुढे जाणार नाही. एका रिपोर्टनुसार मुरादाबाद रेल मंडळ ने हे डिवाइस लावण्याचा प्रस्ताव मुख्यालयाला पाठवलेला आहे.
असे कार्य करते हे डिवाइस
रेल्वे ने ट्रेन दुर्घटना थांबविण्यासाठी एक दुर्घटना रहित डिवाइस बनवले आहे. हे डिवाइस दोन भागांमध्ये विभागले असेल, एक भाग ट्रेनच्या इंजिन मध्ये लावला जाईल आणि दुसरा भाग सगळ्या सिग्नलवर लावलेला असेल.
हे डिवाइस ट्रेनच्या इंजिन ब्रेक सिस्टम आणि इंजिनला बंद करणारी जी सिस्टम असेल त्याच्याशी जोडला गेलेला असेल. सिग्नलच्या 500मीटर आधीच ट्रेन पोहोचेपर्यंत इंजिनमध्ये लावलेले डिव्हाईस ड्रायव्हरला सावध करेल.
हे डिवाइस ड्रायव्हरला सावध करेल की लवकरच सिग्नल येणार आहे सोबतच हे डिवाइस सिग्नल लाल आहे की हिरवा याबाबत सुद्धा ड्रायव्हरला सुचना देईल.
जर सिग्नल लाल असेल तर अशा वेळी ड्रायव्हर ब्रेक लावून ट्रेन थांबवेल आणि आणि जर असे करणे ड्रायव्हरला शक्य नाही झाले तर स्वतः हे डिवाइस इंजिन द्वारे ब्रेक लावून गाडी थांबवेल.
अशातच सिग्नल आधीच ट्रेन थांबवेल म्हणजेच ड्रायव्हरने जर काही चूक केली तर इंजिन स्वतः बंद पडून जाईल.
अनेकदा अशी परिस्थिती निर्माण होते की काही तांत्रिक चुकांमुळे एकाच रूळावर दोन ट्रेन येऊन जातात अशा वेळीसुद्धा हे डिवाइस पुढे आणि मागे असलेल्या लाल लाईट प्रकाशमुळे सिग्नल स्वीकारून घेईल आणि ट्रेन थांबवेल.
मुरादाबाद रेल्वे मंडळ ते लखनऊ स्थानक पर्यंत सगळ्या सिग्नल्सवर दुर्घटना रहित डिवाइस लावण्याचा प्रस्ताव तयार करणार आला आहे, यामध्ये 500 कोटी रुपये एवढा खर्च येऊ शकतो. मंडळ रेल्वे प्रशासन ने प्रस्ताव तयार करून उत्तर रेल्वे मुख्यालयद्वारे रेल्वे बोर्डला पाठवण्यात आला आहे.
संबंधित बातम्या :
इलेक्ट्रिक वाहनांच्या तेजीतून करायची कमाई, तर निफ्टी ऑटो ईटीएफमध्ये करा गुंतवणुकीची तयारी