नवी दिल्ली : 30 ऑगस्ट 2023 : मशरूम ही वर्षभर बाजारात उपलब्ध असते. मशरूमची शेती बिहारमध्ये जास्त केली जाते. मशरूमची शेती फायदा देणारी आहे. बिहारमधील कित्तेक शेतकऱ्यांचे जीवन मशरूम शेतीने बदलवले. मशरूम विकून लाखो रुपयांचे उत्पन्न मिळवले जात आहे. कारण मशरूम महाग विकते. मशरूमचा भाव वर्षभार साधारण २०० ते ३०० रुपये किलो आहे. परंतु, आता आम्ही ज्या मशरूमबद्दल सांगणार आहोत ते हजारो नव्हे तर लाखो रुपये किलो मिळते. जगातील श्रीमंत लोकं ही महागडी मशरूम खरेदी करतात. जाणून घेऊन या महागड्या मशरूमबद्दल.
जगातील सर्वात महाग मशरूम युरोपीयन व्हाईट ट्रफल मशरूमला मानले जाते. आंतरराष्ट्रीय बाजारात या मशरूमची किंमत ८ ते ९ लाख रुपये किलो आहे. युरोपीयन व्हाईट ट्रफल मशरूमची शेती केली जात नाही. हे मशरूम जुन्या झाडांवर आपोआप उगवते. ही मशरूम खाल्ल्याने कित्तेक रोग आपोआप बरे होतात.
आंतरराष्ट्रीय बाजारात मात्सुताके मशरूमची किंमत ३ ते ५ लाख रुपये किलो आहे. मात्सुताके मशरूम आपल्या गंधासाठी ओळखले जाते. पांढऱ्या रंगाचे असते. याची भाजी अतिशय स्वादिष्ट असते.
शेंटरेल मशरूमची शेती केली जात नाही. जंगलात आपोआप उगवते. युरोप आणि युक्रेन समुद्र किनाऱ्यावर ही मशरूम उगवते. शेंटरेल मशरूम वेगवेगळ्या रंगाची असते. पिवळ्या रंगाची शेंटरेल मशरूम प्रसिद्ध आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात याची किंमत ३० ते ४० हजार रुपये किलो आहे.
ब्लॅक ट्रफल मशरूम हे युरोपातील व्हाईट ट्रफल मशरूमसारखा असतो. हीसुद्धा दुर्लभ जातीची मशरूम आहे. परदेशात ब्लॅक ट्रफल मशरूमची किंमत १ ते दोन लाख रुपये किलो आहे.
गुच्छी मशरूम हिमाचल प्रदेशातील पहाडी भागात उगवते. याचीसुद्धा शेती केली जात नाही. पहाडावर आपोआप उगवते. स्पंज मशरूमच्या नावाने ही शेती ओळखली जाते. या मशरूमध्ये औषधीय गुणधर्म असतात. या मशरूमचे सेवन केल्याने शरीर सुदृढ राहते. आंतरराष्ट्रीय बाजारात या मशरूमचे भाव २५ ते ३० हजार रुपये किलो आहेत.