आग लागल्यानंतर सगळ्यात आधी सुरक्षेची कोणती पावलं उचलायला हवीत? जाणून घ्या सर्वकाही!

| Updated on: Jan 22, 2022 | 9:13 PM

आगीच्या घटना घडून गेल्यानंतर दोषींवर कारवाई करण्यासारख्या गोष्टी केल्या जातात. त्या इमारतीचे फायर ऑडिट केले होते का? याला जबाबदार कोण असे अनेक प्रश्न उपस्थित होतात. पण या घटना घडू नयेत किंवा त्या कशा टाळता येतील यासंबंधीच्या उपायोजना करणे गरजेचे आहे.

आग लागल्यानंतर सगळ्यात आधी सुरक्षेची कोणती पावलं उचलायला हवीत? जाणून घ्या सर्वकाही!
आगीचा प्रातिनिधिक फोटो
Follow us on

आपल्या सभोवताली दैनंदिन जीवनामध्ये आपण अनेक ठिकाणी आग (Fire Incident) लागल्याच्या अनेक बातम्या ऐकतो, ही आग कधी, कुठे आणि कशी लागेल याबद्दल आपण काहीही सांगू शकत नाही. मात्र आग लागल्यानंतर ती आटोक्यात कशी आणता येईल किंवा ती लागण्याआधी आपण कोणती काळजी घेऊ शकतो याबाबत आपण सजग असणे अत्यंत आवश्यक आहे. या अनुषंगाने आपण काही गोष्टी समजून घेणे आगीसंबंधी कायद्यामध्ये बदल करणे, स्वतःला ट्रेन करणे, इतरांना त्या बाबतची माहिती देणे यांसारख्या गोष्टी करून यासारख्या गोष्टी टाळू शकतो किंवा त्यांचे प्रमाण कमी करू शकतो.आग लागलेल्या अनेक ठिकाणी आपण पाहतो की या ठिकाणांचे फायर सेफ्टी ऑडिट झालेले नसते. अशा परिस्थितीत या समस्येचा सामना कसा करायचा याची पूर्वतयारी कशी करायची याबाबत काही गोष्टी जाणून घेणे आपल्या फायद्याचे ठरेल..

आग लागलीये..काय कराल..?

आग कोणत्या कारणामुळे लागली हा नंतरचा भाग मात्र आगीच्या ठिकाणी जर आपण उपस्थित असू तर तात्काळ तिथून आपल्याला बाहेर कसे पडता येईल याबाबत प्रयत्न करणे आवश्यक आहे. प्रत्येक इमारतीमध्ये इमर्जन्सी एक्झीट असते त्यावेळी त्याचा वापर करून आपण तात्काळ तेथून बाहेर पडणे आवश्यक आहे. अशावेळी घरातून बाहेर पडताना गॅस, लाईटचे स्वीच वगैरे सर्व बंद आहेत का याची खात्री करून घेणे बंधनकारक आहे. अशी कोणती गोष्ट चालू राहिली तर आगीचा भडका होवून आग आणखीन वाढण्याची शक्यता बळावू शकते.

सर्वात महत्त्वाचं म्हणजे या परिस्थितीमध्ये घाबरून न जाता संयमाने आणि धीराने तिथून बाहेर पडणे आवश्यक आहे तुम्ही आहात त्या ठिकाणी धुराचे प्रमाण जास्त असेल त्याचा तुम्हाला त्रास होत असेल तर ओला कपडा तोंडावर बांधून त्याच्या पासून आपले संरक्षण करावे. धूराचे प्रमाण जास्त असेल तर जमिनीवरून रांगत रांगत जाऊन त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करावा.

आग लागलेल्या ठिकाणी इमारतच असेल याची आपण खात्री देऊ शकत नाही.मॉलमध्ये सुद्धा उपस्थित असताना आग लागली तर तेथे आपल्या सुरक्षेचे अनेक यंत्र लावलेली असतात त्याच ठिकाणी रिसेप्शन एरियामध्ये संपूर्ण नकाशा असतो त्या नकाशाचा वापर करून तुम्ही तिथून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करू शकतात.

एखाद्या ठिकाणी आग लागल्याची माहिती तुम्हाला मिळतात त्यासंबंधीची माहिती तेथील सुरक्षा अधिकाऱ्यांना तात्काळ द्या. ती माहिती देताच त्यासंबंधीच्या उपाय योजना लवकरात लवकर सुरू करून अनेकांचा जीव वाचविण्यास आपण मदत करू शकतो आणि आग आटोक्यात येऊ शकते. अनेक ठिकाणी फायर अर्लाम असतात ते दाबून इतरांनाही धोक्याची सूचना देता येवू शकते असे केल्याने स्वतःच्या प्राणांसोबत इतरांचेही प्राण वाचवले जावू शकतात.

काळजी घेणं महत्वाचे :

अनेकदा परिस्थिती अशी असते की आपल्याला अपघात टाळता येत नाही. मात्र तरीही अनेकदा आपल्याला काळजी घेऊन इतरांना त्यातून बाहेर काढण्यास मदत करता येऊ शकते. अशा वेळी पोलीस, अग्निशमन दल यांना तातडीने यासंबंधीची माहिती सुद्धा पण देऊ शकतो. एक सामान्य नागरिक म्हणून आपली ही जबाबदारी आहे व सामान्य नागरिक म्हणून आपले सहकार्य मिळालं तर प्रशासनासही त्या परिस्थितीत नियंत्रण मिळायला खूप मोठे सहकार्य मिळते.
इमारतीचे फायर ऑडिट होणे सुद्धा तेवढेच गरजेचे आहे. ज्या पद्धतीने आपण इतर गोष्टींची काळजी घेतो त्याच पद्धतीने याची काळजी घेणे सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे. या व अशा अनेक गोष्टींची काळजी घेऊन आपण नक्कीच आग लागण्याचे प्रमाण आणि त्यानंतर होणारी हानी मोठ्या प्रमाणात कमी करू शकतो.

ठोस उपाययोजनांची आवश्यकता :

आग लागू नये यासाठी काही प्रतिबंधात्मक उपाय आणि त्या पद्धतीचे कायदे करण्याची आपल्याकडे फार आवश्यकता आहे. त्यातून आपण अनेक घटना रोखू शकतो. कारण अनेकदा आगीच्या ठिकाणी मालमत्तेचे नुकसान तर होतेच त्याशिवाय अनेकदा मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या सुद्धा फार मोठी असते. त्यामुळे या घटनांकडे गांभीर्याने बघण्याची आवश्यकता आहे आणि त्या पद्धतीने उपाययोजना करणे आवश्‍यक आहे.

आपणा अनेकदा पाहिले असेल की अनेक पाश्चिमात्य देशांमध्ये किंवा आपल्याकडील हॉटेल्समध्ये सुद्धा काही कारणांमुळे धूर झाला तर लगेच अलार्म ऍक्टिव्हेट होतो. त्यामुळे तिकडे संभाव्य धोका निर्माण होत आहे का यासंबंधी सूचना संबंधित प्रशासनास मिळत असते.

शाळा- कॉलेजातून शिक्षण देणे महत्वाचे :

अनेकदा शाळा, कॉलेज शैक्षणिक संस्था या ठिकाणीसुद्धा आगीच्या घटना लागल्याचे आपण अनेकदा ऐकतो. या ठिकाणी विद्यार्थी असल्यामुळे परिस्थिती खूप अवघड होऊ शकते. या विद्यार्थ्यांना येथून बाहेर पडणे त्यासंबंधीचे ज्ञान नसल्यामुळे तेथून ते बाहेर पडू शकत नाही. शिक्षक वर्ग आणि एकूण असणा-या विद्यार्थ्यांची संख्या यामुळे परिस्थीती फार चिघळू शकते. ती परिस्थिती नियंत्रणात आणणे अवघड होऊ शकते, त्यामुळे शालेय व कॉलेजच्या विद्यार्थ्यांना या परिस्थितीशी सामना करण्याचे ट्रेनिंग त्याबद्दलची माहिती, शिक्षण देणे अत्यंत आवश्यक आहे.

आपत्कालीन परिस्थितीत यांना साधू शकतो संपर्क

अपघात किंवा आपत्कालीन परिस्थितीच्या वेळी पोलिस, रुग्णवाहिका किंवा अग्निशमन दल यांची मदत घेतांना वेगवेगळ्या क्रमांकावर संपर्क करावा लागतो. पोलिसांसाठी 100, रुग्णवाहिकेसाठी 102 तर अग्निशमन सेवेसाठी 101 असे नंबर आहेत.

इतर बातम्या :

आर्मीतील श्वान फक्त गंधाने बॉम्बच नाही तर या अनेक गोष्टीसुद्धा चलाखीने शोधून काढतात, कशी असते स्पेशल ट्रेनिंग!!

2600 वर्षांपूर्वी मृत पावलेल्या इजिप्तमधील महिलेचा चेहरा पुन्हा तयार करण्यात आला! कारण ऐकून थक्क व्हाल!

भविष्यात एंटीबायोटिक सुध्दा ठरणार फेल? जग आणखीन एका महामारीच्या दिशेने चाललंय?