मुंबई : दरवर्षी आज 26 जानेवारी (26th January) रोजी जगभरात आंतरराष्ट्रीय सीमाशुल्क दिन (International custom Day) साजरा केला जातो. 26 जानेवारी 1953 रोजी जागतिक सीमाशुल्क संघटना (WCO) ची स्थापना झाल्याच्या स्मरणार्थ या दिवसाचे आयोजन केले जाते. जागतिक सीमाशुल्क संघटनेच्या सीमाशुल्क सहकार्य परिषदेचे पहिले सत्र भरवण्यासाठी जगभरातील 179 सदस्य देशांच्या सीमाशुल्क प्रशासनांद्वारे दरवर्षी 26 जानेवारी रोजी विविध राष्ट्रीय कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. WCO सचिवालय आंतरराष्ट्रीय सीमाशुल्क दिनासाठी एक थीम निवडते. जागतिक सीमाशुल्क संघटना (WCO) डिजिटल सीमाशुल्क अंतर्गत सीमाशुल्क प्रक्रियेच्या डिजिटायझेशनला प्रोत्साहन देण्यासाठी समर्पित आहे. या दिवसाला एक वेगळे महत्व आहे, या दिवसामुळेही अनेक देश एकमेकांशी जोडले गेले आहेत.
2017 मध्ये, सुमारे 70,000 कर अधिकार्यांनी GST परिषदेने घेतलेल्या काही निर्णयांच्या निषेधार्थ असहकार आंदोलन सुरू करण्याची घोषणा केली. कामगार संघटनांनी आंदोलन सुरू करत आंतरराष्ट्रीय सीमाशुल्क दिन न पाळण्याचा निर्णय घेतला आहे. यासोबतच 30 जानेवारीला ‘शहीद दिना’ला काळी पट्टी बांधून ‘ब्लॅक डे’ साजरा करणार असल्याचेही त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे. जागतिक समीशुल्क संघनटमुळे देशादेशातील व्यापार आणखी सलोख्याचा झाला आहे. जगातील अनेक देशातून एकमेकांबरोबर व्यापार सुरू असतो. बाहेरून येणाऱ्या प्रत्येक वस्तूवर कस्टम ड्युटी लागते. जसे की आपण बाहेरील देशातून पेट्रोल डिझेलची मोठ्या प्रमाणात आयात करतो, जसे अनेक प्रकारची मशिनरी आयात करतो, त्या सर्व वस्तूंवर कस्टम ड्युटी लागते. बाहेरील देशातून येणाऱ्या प्रत्येक गोष्टीत कस्टम विभाग अत्यंत महत्वाची भूमिका बजावतो.
जागतिक सीमाशुल्क संघटना ही एक आंतरसरकारी संस्था आहे, ज्याचे मुख्यालय ब्रुसेल्स, बेल्जियम येथे आहे. WCO आंतरराष्ट्रीय अधिवेशने, उपकरणे, कमोडिटी वर्गीकरण, मूल्यमापन, मूळ नियम, सीमाशुल्क महसूल गोळा करणे आणि इतर विषयांचा समावेश असलेल्या क्षेत्रातील कामासाठी प्रख्यात आहे. WCO वस्तूंच्या नामांकनाची आंतरराष्ट्रीय सुसंवाद प्रणाली (HS), व्यापार संघटना (WTO) च्या तांत्रिक बाबी, सीमाशुल्क मूल्यांकन आणि मूळ नियमांची देखरेख करते. सध्या, WCO एकत्रितपणे जगभरातील 180 सीमाशुल्क प्रशासनाचे प्रतिनिधित्व करते. आतरराष्ट्रीय व्यापाराच्या दृष्टीने या दिवसाला बरेच महत्व आहे.