नवी दिल्ली : मागील काही वर्षांमध्ये पुरुषांमध्ये आपल्या आरोग्याबाबत नवीन क्रेज तयार झालीय. महिलांच्या सौंदर्यप्रसाधन वस्तूंप्रमाणे पुरुषांसाठी देखील अनेक वस्तू बाजारात लाँच करण्यात आल्यात. मात्र, त्यानंतरही अशा काही चुकीच्या आणि खोट्या गोष्टी आहे ज्यावर लोक आजही सहजासहजी विश्वास ठेवतात. इंटरनेटवर पुरुषांच्या लैंगिक आयुष्यापासून तर अगदी केस गळण्यापर्यंत अनेक चुकीच्या थियऱ्या मांडणाऱ्या वेबसाईट्सचा खच पडलाय (Top 5 Google search by mens regarding health myths including weak erections to hair loss).
नुकताच frommars.com ने एक संशोधन अहवाल जारी केलाय. यात पुरुष गुगलवर काय काय सर्च करतात याची माहिती देण्यात आलीय. या यादीतील सर्वाधिक सर्च होणाऱ्या 5 गोष्टींपासून पुरुषांनी वेळीच सावध झालं पाहिजे. या 5 गोष्टी खालीलप्रमाणे,
फार्मासिस्ट नवीन खोसला यांनी इरेक्शन आणि नपुंसकता याविषयीच्या चुकीच्या समजाविषयी माहिती दिली. ते म्हणाले, “जर एखाद्या पुरुषाला इरेक्शनमध्ये अडचण येत असेल तर तो नपुंसकच असेल असं नाही. त्याचं वेगळं कारणंही असू शकतं. ही अडचण वयोवृद्धांमध्ये अधिक असते. यात डायबिटीज, ओबेसिटी आणि उच्च रक्तदाबासारख्या अनेक अडचणी कारणीभूत असतात. आपल्या दैनंदिन आयुष्यात बदल करुन या अडचणींवर मात करता येते. यासाठी दारुपासून दूर राहणं आवश्यक आहे.”
दाढी केल्यानं केस वाढतात याचा कोणताही पुरावा अद्याप संशोधकांना मिळालेला नाही. केस वाढण्याची अनेक कारणं असतात. यात अधिक औषधं घेतली तरी केस वाढतात.
पुरुषांना महिलांइतका ब्रेस्ट कँसर होत नाही. मात्र, प्रमाण कमी असलं तरी पुरुषांनाही ब्रेस्ट कँसर होतो. वयाच्या 60 वर्षानंतर या समस्येला तोंड द्यावं लागू शकतं. त्यामुळे लक्षणांकडे बारकाईने पाहिलं पाहिजे.
Top 5 Google search by mens regarding health myths including weak erections to hair loss