मुंबई : भारतातील तुरुंगामध्ये (Prisoners In India) कैद्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.अनेकदा या कैद्यांसाठी तुरुंगामध्ये जागासुद्धा शिल्लक राहत नाही एवढी यांची संख्या दिवसेंदिवस वाढलेली आहे. अशावेळी तुरूंगामध्ये जागा शिल्लक न राहिल्याने कैद्यांना योग्य त्या सुविधा सुद्धा दिल्या जात नाहीत. याबद्दल अनेक प्रश्न निर्माण होतात. या वाढलेल्या कैद्यांच्या संख्येमध्ये असा एक वर्ग आहे, ज्या वर्गाची अद्यापही सुटका झालेली नाही म्हणजेच हा वर्ग कैदी म्हणून तुरुंगामध्ये शिक्षा भोगत आहे परंतु त्यांच्यावरील आरोप अद्यापही सिद्ध व्हायचे बाकी आहेत आणि यावरून ते दोषी आहेत की निर्दोष आहेत याचा निर्णय सुद्धा अजून घेतला गेलेला नाही. अशा प्रकारच्या कैद्यांना विचाराधीन कैदी (Under Trial Prisoners) म्हटले जाते. जे अद्याप दोषी ठरले नाहीत त्यांच्याबद्दल कोर्टामध्ये (Court) मॅटर चालू आहे. त्यामुळे भारतामध्ये या विचाराधीन केद्यांची संख्या नेमकी किती आहे याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.
खरे तर नुकतेच खासदार डॉक्टर विकास महात्मे यांनी संसदेत गृहमंत्रालयाला प्रश्न उत्तराच्या तासात प्रश्न विचारला आहे की देशांमध्ये विचाराधीन कैद्यांची एकंदरीत संख्या किती आहे आणि यांच्यावर पेंडिंग असलेल्या केसेसचा निकाल कधी लावला जाईल? तसेच यासाठी सरकारतर्फे नेमकी काय पावले उचलली जात आहेत. याबद्दल प्रश्न विचारला आहे. या प्रश्नावर उत्तर देताना गृहमंत्रालयाने सांगितले की नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो (एनसीआरबी) यांच्याद्वारे तुरुंगात संबंधित डेटा ठेवला जातो आणि त्यांना आपला वार्षिक रिपोर्ट ‘प्रिजन स्टॅटिसटिक्स इंडिया’ मध्ये प्रकाशित करावा लागतो. दरम्यान, वर्ष 2020 चा रिपोर्ट समोर आला आहे.
31 डिसेंबर 2020 च्या स्थितीनुसार तुरुंगात असलेल्या विचाराधीन कैद्यांची संख्या खूपच जास्त आहे. पूर्ण भारतामध्ये 3,71,848 कैदी असे आहेत की जे विचाराधीन आहेत. यात 28 राज्यातील 3,52,495 कैदी आहेत आणि 8 संघ राज्य क्षेत्रात कैद्यांची संख्या 19,353 इतकी आहे. हा डेटा आपल्याला सांगतो की, भारतामध्ये अंदाजे पावणेचार लाख कैदी असे आहेत, जे दोषी असल्याचं अद्याप सिद्ध झालेलं नाही.
हैराण करणारी सर्वात मोठी गोष्ट म्हणजे की, या विचाराधीन कैद्यांमध्ये असे अनेक लोक आहेत जे 5 वर्षापेक्षा जास्त काळ तुरुंगामध्ये शिक्षा भोगत आहेत. दोषी ठरवले गेले नसून सुद्धा या व्यक्तींना जेलमध्ये बंद करण्यात आले आहे. तसेच गेल्या 5 वर्षांपासून अधिक काळ त्यांना तुरुंगाची हवा खावी लागत आहे. गृहमंत्रालयाच्या रिपोर्टनुसार 7,128 कैदी असे आहेत जे 5 वर्षांपेक्षा जास्त काळ त्यांनी तुरुंगामध्ये व्यतीत केलेला आहे.
याशिवाय 3 ते 5 वर्षापर्यंत अधिक काळ तुरुंगात राहणाऱ्या कैद्यांची संख्या सुद्धा जास्त असल्याचे आपल्याला पाहायला मिळते यांची संख्या 16603 इतकी आहे. या कैद्यांमध्ये 2 किंवा 3 वर्षा पेक्षा जास्त 29194 आणि 1 ते 2 वर्षापेक्षा जास्त 54287 कैदी तुरुंगात बंदिस्त आहेत. तर उरलेल्या अन्य कैद्यांबाबत बोलायचे झाल्यास यामध्ये असे सुद्धा काही कैदी आहेत जे 3 महिन्यांपेक्षा जास्त कालावधीपासून तुरुंगामध्ये बंद केलेले आहेत त्यांची संख्या 1,30,335 एवढी आहे.
उत्तर प्रदेशमधील सर्वात जास्त विचाराधीन कैदी तुरुंगात आहे आणि यांची संख्या 80557 एवढी आहे त्यानंतर चा 2 नंबर बिहार राज्याचा लागतो येथे विचाराधीन कैद्यांची संख्या 44187 इतकी आहे. तिसरा नंबर मध्य प्रदेश राज्याचा आहे जेथे 31712 असे कैदी लोक आहेत जे जेलमध्ये बंद आहेत आणि आत्तापर्यंत कोर्टामध्ये त्यांच्या विरोधात कोर्ट प्रकरण चालू आहे.
राणू मंडल यांनी सुरात गाण्याचा प्रयत्न केला Kacha Badam; पण यूझर्स उडवतायत खिल्ली, पाहा Video
Dancing Dadलाही Kacha Badamची भुरळ, मुलासह दिला जबरदस्त परफॉर्मन्सनंतर! यूझरच्याही मजेशीर कमेंट्स
Trending बंगाली गाणं Kacha Badamवर एअर होस्टेसनं केला फ्लाइटमध्येच डान्स, Video Viral