मुंबई : आपण निटनेटकं दिसलं पाहिजे. राहण्यात टापटीपणा असावा असे आपण अनेक वेळा ऐकत आलो आहोत. या नियमांचं पालन अनेकजण करतातदेखील. काही लोक नियमित अंघोळ करतात. स्वच्छ कपडे परिधान करतात. मात्र, लोकांना दिसणारे कपडेच स्वच्छ ठेवले पाहिजेत का ? आतल्या म्हणजेच अतर्वस्त्रांच्या स्वच्छतेचे काय महत्त्व आहे ? या सगळ्या प्रश्नांची उत्तर या स्पेसल रिपोर्टमध्ये आहेत. (underwear mistakes which affect bad on your health on how to wear and how to use)
या जगात अंतर्वस्त्राला घेऊन अनेक गैरसमज आहेत. इंटरनेट मार्केट रिसर्च पोर्टलच्या 2017 च्या संशोधनानुसार जवळपास 17 टक्के पुरुष आपले अंतर्वस्त्र न धुताच पुन्हा-पुन्हा वापरतात. तर ऑनलाईन कपडे विकणारी बनाना मून क्लॉथिंग या संस्थेच्या म्हणण्यानुसार 26 टक्के महिला पाच-पाच दिवस एकच ब्रा वापरतात. 6 टक्के महिला तर अशा आहेत की, त्या 10-10 दिवस एकच ब्रा घालतात.
ही सर्व माहिती गंभीर असून अंतर्वस्त्र योग्य पद्धतीने वापरण्याची पद्धत, तसेच अंतर्वस्त्र घालताना घ्यावयाची काळजी याची माहिती असणे गरजेचे आहे. सर्वात प्रथम आपण परिधान करत असलेल्या अंतर्वस्त्राचा कपडा आपल्या स्किनसाठी सुटेबल असायला हवा. सिंथेटिक किंवा टेरिकॉटन अंतर्वस्त्रामुळे आपल्या खासगी भागच्या आसपास बॅक्टेरियांची वाढ होण्याची शक्यता असते. ज्यामुळे त्वचेची आग, खाज येणे, गचकरण अशा समस्या निर्माण होतात. कॉटनचा कपडा असलेल्या अंतर्वस्त्रामुळे तुलनेने इन्फेक्शन्स कमी होते.
तुम्ही जर जीमला जात असाल तर त्यासाठी कोणते अंतर्वस्त्र असावे याची माहिती असणे गरजेचे आहे. जीमसाठी बाजारात विशेष जीम सपोर्टर्स मिळतात. महिलांसाठी त्यांना सुटेबल असणाऱे ब्रा असतात. जीमसाठी अंतर्वस्त्र खरेदी करताना तुम्हाला तुमची साईझ माहिती असणे गरजेचे आहे. जीमसाठी जास्त गच्च अंतर्वस्त्र खरेदी करणे टाळावे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे जीमवरुन आल्यानंतर अंतर्वस्त्र जरूर बदलावेत. कारण घाम तसेच योनीस्त्रावामुळे इन्फेक्शन होण्याच धोका असतो.
अंतर्वस्त्र धुतानादेखील काही काळजी घेणे गरजेचे आहे. अंतर्वस्त्रासाठी सुगंधी डिटर्जंट पावडर वापरणे टाळायला हवे. कारण अशा डिटर्जंटमुळे चट्टे तसेच अॅलर्जी होण्याची शक्यता असते. त्यामुळे हायपो अॅलर्जेनिक डिटर्जंट वापरावे. अंतर्वस्त्रांना ड्रायरमध्ये ठेवू नये. कारण ड्रायरमध्ये अंतर्वस्त्र खराब होण्याची शक्यता असते. ज्यामुळे ते ढिले होतात.
आजकाल महिला वेगवेगळ्या प्रकारच्या ड्रेसवर वेगवगळे अंतर्वस्त्र वापरतात. आपल्या ड्रेसनुसार महिला अंतर्वस्त्र वापरतात. मात्र, अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे अंतर्वस्त्र वापरण्याचे काही तोटे आहेत. कारण शेपविअरमुळे शरीर आखडून जाते. तसेच शेपवियमुळे किडनी, मुत्राशय यावर अतिरिक्त दबाव येण्याची शक्यता असते. अशा त्रासाकडे कानाडोळा केला तर भविष्यात हा त्रास आजारामध्येसुद्धा बदलू शकतो. अशा प्रकारे अंतर्वस्त्राच्या बाबतीत काळजी घेणे गरजेचे आहे.
इतर बातम्या :
ड्रामा क्वीन राखी सावंत म्हणतेय, ‘मला भाईजान सलमान खानला राखी बांधायचीय, कारण…’
(underwear mistakes which affect bad on your health on how to wear and how to use)