मुंबई : आपण सर्वजण व्हॅनिला फ्लेवर्ड आईस्क्रीम खातो. व्हॅनिला फ्लेवरच्या मध्यम चवीमुळे मुलांना या फ्लेवरचे आईस्क्रीम खायला खूप आवडते. पण तुम्ही कधी विचार केला आहे की ही व्हॅनिला काय आहे आणि ते कुठून येते? तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की व्हॅनिला हा एक मसाला आहे, ज्याची लागवड केली जाते. भारतात व्हॅनिलाची लागवड प्रामुख्याने तामिळनाडू, केरळ आणि कर्नाटक या राज्यांमध्ये केली जाते. याशिवाय परदेशामध्ये पूर्व मेक्सिको, ग्वाटेमाला, मध्य अमेरिका, युगांडा, जमैका इत्यादी ठिकाणीही याची लागवड केली जाते. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की व्हॅनिला हा जगातील सर्वात महाग मसाल्यांपैकी एक मसाला आहे. या मसाल्याची किंमत 30 ते 40 हजार रुपये प्रति किलो इतकी आहे. (Vanilla is very beneficial for health, know more about it)
व्हॅनिला मुख्यत: आईस्क्रीममध्ये वापरला जातो. मीडिया रिपोर्टनुसार, जगभरात बनवलेल्या 40 टक्के आईस्क्रीममध्ये व्हॅनिला फ्लेवरचा वापर केला जातो. याव्यतिरिक्त केक, बेकरी उत्पादने, पेये, परफ्यूम आणि इतर सौंदर्य उत्पादनांमध्ये व्हॅनिलाचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो.
व्हॅनिलामध्ये अनेक प्रकारची पोषक द्रव्ये आढळतात, जी आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. त्यात व्हॅनिलिन आढळते, जे आपल्या शरीरातील कोलेस्टेरॉल नियंत्रित ठेवते. हे आपल्या शरीरातील हानिकारक कोलेस्टेरॉल कमी करते आणि फायदेशीर कोलेस्टेरॉल वाढवण्यास मदत करते.
व्हॅनिलामध्ये अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात आढळतात, जे आपल्यासाठी खूप फायदेशीर आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की व्हॅनिलामुळे कर्करोगसारख्या भयंकर व दुर्धर आजारांचा धोकाही कमी होतो.
दाहक-विरोधी गुणधर्मांनी समृद्ध असलेला व्हॅनिला मसाला आपल्या यकृत आणि सांध्यांसाठी देखील खूप फायदेशीर आहे. यासह यात बॅक्टेरियाविरोधी घटक देखील असतात. हे घटक आपली प्रतिकारशक्ती वाढवतात.
आपल्या मानसिक आरोग्यासाठी देखील व्हॅनिला खूप फायदेशीर आहे. त्यामुळे तुम्ही जर व्हॅनिला फ्लेवरच्या आइस्क्रिमला पसंती देत असाल तर ते तुमच्या आरोग्याच्या दृष्टीने उपयुक्तच असेल, हे लक्षात घ्या. (Vanilla is very beneficial for health, know more about it)
नदीपात्रात सेल्फी घेणं महागात, तीन मित्र वाहून गेले, एकाला वाचवण्यात यश, दोघांचा पत्ताच नाहीhttps://t.co/N57rpZPDXk#Drown #Crime #River #Selfie
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 30, 2021
इतर बातम्या
कोरोनाची तिसरी लाट ‘या’ महिन्यांत शिखर गाठेल; शास्त्रज्ञांनी वर्तवला अंदाज
जळगाव जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध होण्याची चिन्हे! बैठकीसाठी खडसे-महाजन आले एकत्र