मुंबई : बॉलिवूड अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) आणि अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) यांच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरु आहे. लग्नाचे विधी, हॉटेल्स, आलिशान विवाहसोहळे यांची इंटरनेटवर बरीच चर्चा होत आहे. राजस्थानच्या रणथंबोरजवळील एका छोट्या गावात ही सेलेब जोडी लग्न करणार आहे. लग्नाच्या चर्चेदरम्यान दोघेही जिथे लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत त्या हॉटेलची बरीच चर्चा आहे. खरंतर, या जोडीने लग्नासाठी जे हॉटेल निवडले आहे, ते राजस्थानची राजधानी जयपूरपासून 110 किमी दूर असलेल्या गावात बनवले आहे, त्यामुळे लोक त्याची चर्चा करत आहेत.
अशा परिस्थितीत लोकांना असा प्रश्न पडला आहे की, या ठिकाणात किंवा हॉटेलमध्ये असे काय खास आहे की, या सेलिब्रिटींनी हॉटेलला लग्नासाठी योग्य ठिकाण मानले. तुम्हालाही असा प्रश्न पडलाय? चला तर, जाणून घेऊया या हॉटेलमध्ये काय खास आहे आणि या हॉटेलच्या इतिहासाशी संबंधित काही खास माहिती….
विकी कौशल आणि कतरिना कैफ राजस्थानमधील सवाई माधोपूर जिल्ह्यातील एका आलिशान हॉटेलमध्ये लग्न करणार आहेत. हे हॉटेल सवाई माधोपूरच्या बरवारा चौथ गावात आहे. हेरिटेज हॉटेल असल्याने हे हॉटेल अनेक श्रीमंत लोकांची पहिली पसंती आहे. ‘सिक्स सेन्सेस हॉटेल’ असे हॉटेलचे नाव आहे. हॉटेल सिक्स सेन्स ग्रुपला ते भाडेतत्त्वावर दिले आहे, म्हणून त्याला ‘सिक्स सेन्सेस बारवारा किल्ला’ असे म्हणतात.
लोकेशनबद्दल बोलायचे झाले, तर हॉटेलचे लोकेशन असे काही खास नाही. हॉटेलमधून पाहिल्यावर टेकडीवर चौथ मातेचे एक मंदिर दिसते, ज्यासाठी हे शहर खूप प्रसिद्ध आहे. त्याच वेळी येथून एक पूलही दिसतो आणि शहराचे दृश्यही दिसते. पण, या हॉटेलचा इतिहास याला अधिक खास बनवतो आणि हे लक्झरी हॉटेल लोकांना आकर्षित करते.
पूर्वी हे हॉटेल बरवारा किल्ला होता, जो चौहानांनी 14 व्या शतकात बांधला होता. परंतु, 1734 मध्ये हे हॉटेल राजावत घराण्याने जिंकले होते. जेव्हा दुसरे महायुद्ध सुरू झाले, तेव्हा बरवराचे राजपूत आणि त्यांच्या कुटुंबाने जयपूर राज्याच्या सशस्त्र दलांशी लढाईत भाग घेतला. आता राजघराण्याचे वंशज पृथ्वीराज सिंह यांनी एस्पायर ग्रुपच्या सहकार्याने हे हॉटेल बनवले आहे.
5.5 एकरमध्ये बांधलेल्या या हॉटेलची बाह्य भिंत 5 फूट लांब आहे, जी अनेक ठिकाणी 20 फुटांपर्यंत उंच आहे. हॉटेलमध्ये दोन रेस्टॉरंट्स, बार आणि लाउंज, स्पा, फिटनेस सेंटर, दोन स्विमिंग पूल, बँक्वेट हॉल, बुटीक आणि किड्स क्लब आहेत. संपूर्ण हॉटेलमध्ये शेखावती कलेचा वापर करण्यात आला आहे.
जर, आपण याच्या एका दिवसाच्या भाड्याबद्दल बोललो, तर येथे एका दिवसासाठी राहण्याचा खर्च 70 हजार रुपयांपासून ते 1 लाख रुपयांपर्यंत असू शकतो.