मुंबई : पानीपुरी, समोसे, जिलेबी, कचोरी इत्यादी आपल्या रोजच्या जीवनाचा एक भाग आहेत. बऱ्याच लोकांच्या आवडत्या पदार्थांमध्ये या सर्व पदार्थांचा समावेश आहे. भले कुणाला पानीपुरी आवडत नसेल. परंतु समोसे आणि कचोरीशिवाय स्नॅक पार्टी पूर्णच होत नाही. जिलेबीबद्दल काय सांगावे? समोर जिलेबी दिसताच, ती तोंडात कधी टाकतोय, असा मोह कुणाला आवरता येत नाही. सर्व मिठाई एका बाजूला आणि जिलेबी एका बाजूला. अशाप्रकारे जिलेबी स्वत:चे खास स्थान मिळवून आहे. हे सर्व पदार्थ तुम्ही नक्कीच खात असणार, परंतु या सर्व पदार्थांना इंग्रजीमध्ये काय म्हणतात हे कदाचित सर्वच लोकांना माहित असेल असे नाही. बऱ्याच लोकांना या पदार्थांची इंग्रजी नावे माहित नाहीत. (What are samosas, jalebi, kachori called in English, Very few people know the meaning of English)
आपण या ठिकाणी तुम्हा-आम्हा सर्वांचा आवडता पदार्थ असलेल्या जिलेबीपासून सुरुवात करूया. तूप, तेल, मैदा, साखर अशा विविध घटकांपासून जिलेबी बनवली जाते. जिलेबी ही समारंभांच्या निमित्ताने अनेकांना खायला मिळते. लग्न सोहळ्यात जिलेबी खायला अनेकांची पहिली पसंती असते. पण या जिलेबीला इंग्रजी नाव काय आहे? अनेकांना चटकन उत्तर आठवत नसेल ना. तर आम्ही तुम्हाला सांगतो. जिलेबीला इंग्रजीत Rouded Sweet किंवा Funnel Cake म्हणतात. काही लोक जिलेबीला Sweetmeat किंवा Syrup Filled Ring असेदेखील म्हणतात.
समोसा हा विशेषत: उत्तर भारतीयांचा आवडता नाश्ता आहे. इंग्रजीमध्येसुद्धा याबद्दल लिहायचे किंवा बोलायचे असेल त्यावेळी अनेक लोक बऱ्याचदा समोसाच लिहितात किंवा समोसाच बोलतात. परंतु समोशाला विशिष्ट इंग्रजी नावदेखील आहे. जर तुम्हाला ते माहित नसेल तर आम्ही सांगू इच्छितो की, समोशाला इंग्रजीमध्ये ‘रिसोले’ (Rissole) म्हणतात.
समोश्यांप्रमाणेच आणखी एक आवडता नाश्ता म्हणजे कचोरी. कचोरी खाण्यासदेखील बऱ्याच लोकांची पसंती असते. वाढदिवसासारख्या छोट्या समारंभांमध्ये कचोरी हमखास असते. कचोरीचे इंग्रजी नाव बऱ्याच लोकांना माहित नसेल. वास्तविक याला इंग्रजीत Pie म्हणतात. तथापि, तुम्ही जर दुकानदाराला इंग्रजी नाव सांगून ऑर्डर दिलीत तर दुकानदारही समजू शकणार नाही. काही अपवाद वगळता दुकानदारांनाही कचोरीचे इंग्रजी नाव माहित नसते.
चला तर तरुणपिढीच्या आवडीचे खाद्य असलेल्या पाणीपुरीबद्दल आता जाणून घेऊया. पाणीपुरी आपल्या देशभर पसंत केला जाणारा खाद्यपदार्थ आहे. पाणीपुरीचे इंग्रजी नाव खूप सोपे आहे. पाणीपुरीला इंग्लिशमध्ये ‘वॉटर बॉल’ (Water Balls) असे म्हणतात. वॉटर म्हणजे पाणी आणि बॉल म्हणजे पुरी. किती सोपे आहे ना. वॉटर बॉल्स म्हणजे पाणीपुरी. इंग्रजी अर्थ सोपा असूनही आपण पाणीपुरी म्हणूनच या पदार्थाला ओळखतो.
जेवणासोबत रायताला खूप महत्त्व आहे. रायता सर्रास घरात सहजपणे बनवला जातो. अनेकांना रायता खायला आवडतो. पण तुम्हाला रायताला इंग्रजीमध्ये माहित आहे का? नाही ना! चला तर मग आम्ही तुम्हाला रायताचा इंग्रजी अर्थ सांगतो. रायताला इंग्रजीमध्ये ‘मिक्स कर्ड’ (Mix Curd) म्हणतात. वरील सर्व पाककृतींबद्दल आपल्या मित्रांना विचारून पहा, त्यांनाही कदाचित या लोकप्रिय पदार्थांचे इंग्रजी शब्द माहित नसतील. (What are samosas, jalebi, kachori called in English, Very few people know the meaning of English)
Raj Kundra Case : गुन्हे शाखेच्या तपासा दरम्यान अभिनेत्री शिल्पा शेट्टीला रडू कोसळलं? राज कुंद्रा आणि शिल्पाची एकसोबत चौकशी https://t.co/6GGsPowQUs @MumbaiPolice @Dwalsepatil #RajKundra #RajKundraArrest #ShilpaShettyHusband #ShilpaShettyInquiry
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 24, 2021
इतर बातम्या
VIDEO : लाखो दिल की धडकन असलेली ‘ऑडी’, पार्किंगमध्ये उभी असताना अचानक कशी पेटली?
वेळोवेळी बदलतात भविष्य सांगणाऱ्या हातावरच्या रेषा… जाणून घ्या यामागचे कारण