चित्ता - चित्ता आणि बिबट्या दिसायला सारखेच असतात. त्यांच्यात एक महत्त्वाचा फरक आहे. चित्ता थोडा लहान असतो. चित्त्याचे डोळे खोलवट आणि काळे असतात. त्याचा चेहरा बिबट्यापेक्षा लहान असतो. चित्ता हा पृथ्वीवरील सर्वात वेगाने धावणारा जमिनीवरील प्राणी आहे. त्याला वाघासारखी डरकाळी फोडता येत नाही.
बिबट्या - बिबट्या हा वाघ आणि सिंहाच्या तुलनेत लहान असतो. मात्र, चित्तापेक्षा तो मोठा असतो. बिबट्याच्या शरीरावर काळे गोल ठिपके असतात.
सिंह - सिंह हा वाघ, चित्ता आणि बिबट्या या तिघांपेक्षा वेगळा असतो आणि हा फरक सहज लक्षात येतो. सिंहाच्या तोंडावर खूप सारे केस असतात. त्याला अयाळ म्हणतात. सिंह नेहमी झुंडीत फिरतात.