जगातला असा कोणता देश आहे जेथे एकही भारतीय व्यक्ती नाही?

| Updated on: Nov 04, 2024 | 5:42 PM

General Knowledge: आज आम्ही तुम्हाला जगातील एका अशा देशाबद्दल सांगणार आहोत, जिथे तुम्हाला एकही भारतीय सापडणार नाही. इथली व्यवस्था आणि नियम इतर देशाताली लोकांसाठी खुपच कठोर आहेत. त्यामुळे कोणत्याही देशातील लोकं येथे काम करण्यासाठी किंवा व्यवसाय करण्यासाठी येऊ शकत नाहीत.

जगातला असा कोणता देश आहे जेथे एकही भारतीय व्यक्ती नाही?
Follow us on

आज भारतीय लोकांनी फक्त आपल्याच देशात नाही तर इतर देशांमध्ये जाऊन देखील मोठी प्रगती केली आहे. या देशांमध्ये असलेल्या मोठ्या मोठ्या कंपन्यांचे सीईओ पासून ते इतर महत्त्वाच्या पदांवर भारतीय लोकांचा दबदबा दिसतो. भारतीय लोकं वेगवेगळ्या देशामध्ये आज राहत आहेत. कोणी व्यवसाय करायला गेले आहेत तर कोणी नोकरी, कोणी शिक्षणासाठी गेले आहेत तर कोणी फिरण्यासाठी. भारतीय वंशाचे लोकं किंवा स्थलांतरित भारतीय लोकं आज अनेक देशांमध्ये स्थायिक झाले आहेत. भारतीय समुदायाचे लोकं जगाच्या जवळजवळ प्रत्येक कोपऱ्यात पोहोचले आहेत.

पण तुम्हाला माहित आहे का की अनेक देशांमध्ये भारतीयांची उपस्थिती खूपच कमी आहे किंवा नाहीच आहे. यापैकी एक उदाहरण म्हणजे उत्तर कोरिया. उत्तर कोरियामध्ये भारतीयांची उपस्थिती जवळपास नगण्य आहे. उत्तर कोरियात कठोर नियम आहेत. हा एक हुकूमशाही शासन असलेला देश आहे. त्यामुळे येथे बाहेरील देशांतून येणाऱ्या लोकांवर कडक नजर ठेवली जाते. येथील सरकार परदेशी नागरिक आणि स्थलांतरितांसाठी खूप कठोर नियम बनवते, ज्यामुळे इतर देशांतील लोक येथे स्थायिक होण्यासाठी किंवा काम करण्यासाठी येऊ शकत नाहीत.

उत्तर कोरियामध्ये भारतीय समुदाय जवळपास नाहीच आहे. भारत आणि उत्तर कोरियाचे राजनैतिक संबंध असले. तरी त्यांच्यात सांस्कृतिक किंवा राजकीय संपर्क फारच कमी आहे. येथे भारतीयांना नोकरी किंवा इतर कारणांसाठी जाणे देखील अवघड आहे. कारण उत्तर कोरियामध्ये आर्थिक संधी खूप मर्यादित आहेत. महत्त्वाचे म्हणजे इथे कठोर व्यवस्था असल्यामुळे दुसऱ्या देशांतील लोकांना येथे स्थायिक होणे कठीण जाते.

उत्तर कोरियामध्ये इंटरनेट आणि सोशल मीडियावर देखील कठोर निर्बंध आहेत. ज्यामुळे बाहेरील देशांतील लोकांना तेथे राहणे आणखी कठीण झाले आहे. याचे आणखी एक कारण म्हणजे उत्तर कोरियाचे सरकार परदेशी नागरिकांच्या हालचालींवर कडक नियंत्रण ठेवते असते. पर्यटकांनाही नेहमी गाईडसोबतच राहावे लागते. पर्यटकांच्या प्रत्येक हालचालींवर येथील व्यवस्था बारीक लक्ष ठेवून असते. त्यामुळे भारतीयांसह इतर बहुतांश देशांतील नागरिकांना तेथे जाणे अवघड झाले आहे.

उत्तर कोरिया हा अशा काही देशांपैकी एक आहे जिथे भारतीय समुदायाची उपस्थिती नाहीये. कारण येथे कठोर राजकीय, सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती आहे. ज्यामुळे भारतीयांना तेथे राहणे जवळजवळ अशक्य आहे.