कोणतं फळ पिकण्यासाठी 2 वर्ष लागतात? खूप कमी लोकांना माहितीये उत्तर

| Updated on: Nov 21, 2023 | 1:49 PM

General Knowledge : कोणतेही फळ पिकण्यासाठी साधारणपणे तीन ते चार महिने लागू शकतात. पण असं कोणतं फळ आहे जे पिकण्यासाठी जवळपास दोन वर्ष लागतात. कोणता प्राणी आहे जो

कोणतं फळ पिकण्यासाठी 2 वर्ष लागतात? खूप कमी लोकांना माहितीये उत्तर
fruits
Follow us on

GK in Marathi : सामान्य ज्ञान असणे म्हणजे तो हुशार व्यक्ती असे मानले जाते. आज आम्‍ही तुमच्यासाठी आणखी काही सामान्य ज्ञानात भर पाडतील असे काही प्रश्न घेऊन आलो आहोत. काही प्रश्न खूप सोपे आहेत पण तरी देखील अनेकांना त्याची उत्तरे माहित असेलच असे नाही. तुम्ही अंदाज लावू शकतात. तुम्हाला जर प्रश्नाची उत्तर माहित असतील तर तुम्ही ती कमेंटमध्ये नक्की कळवा. तुमच्या ज्ञानात भर पाडतील असे प्रश्न आम्ही तुम्हाला उत्तरासहीत सांगितले आहे.

विमानाचा शोध कोणत्या देशात लागला?

– विमान बनवण्याचे श्रेय अमेरिकेच्या राइट बंधूंना दिले जाते. 17 डिसेंबर 1903 रोजी त्यांनी बनवलेल्या विमानाने पहिले यशस्वी उड्डाण केल्याचे सांगितले जाते.

कोणते फळ पिकण्यास 2 वर्षे लागतात?

– अननस पिकण्यास 2 वर्षे लागतात.

कोणता प्राणी 3 वर्षे झोपतो?

– सागरी गोगलगाय हा एकमेव प्राणी आहे जो 3 वर्षे झोपतो.

भारतातील कोणत्या शहरात सुवर्ण मंदिर आहे?

– सुवर्ण मंदिर अमृतसर शहरात आहे.

भारतात पहिल्यांदा ट्रेन कधी धावली?

– देशातील पहिली ट्रेन 16 एप्रिल 1853 रोजी सुरू झाली. देशातील पहिली रेल्वे बोरी बंदर ते नंतर मुंबई ते ठाणे अशी धावली.

कोणता जीव 6 दिवस श्वास रोखू शकतो?

– एक विंचू 6 दिवस श्वास रोखू शकतो.