व्हाइट हाऊस हे अमेरिकेच्या राष्ट्रपतीच्या सत्तेचं केंद्र आहे. विशेष म्हणजे देशातील सर्वात सुरक्षित ठिकाण आहे. पण या ऐतिहासिक इमारतीत अनेक सिक्रेट सुरुंग आहेत. आणीबाणीच्या किंवा संकटाच्या काळात राष्ट्रपती आणि त्यांचं कुटुंबाला सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी हे सुरुंग तयार करण्यात आलं आहे. आपण आज या सुरुंगाबाबतचीच माहिती घेणार आहोत. या सुरुंगाची अनोखी डिझाईन आणि त्याच्या सुरक्षेबाबतचा आढावा घेणार आहोत. तसेच हा सुरुंग कसे सिक्रेट आहे, याची माहितीही जाणून घेणार आहोत.
येत्या 20 जानेवारी रोजी डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्रपती म्हणून शपथ घेणार आहेत. अमेरिकेत प्रत्येक निवडणुकीत निवडून आलेला नवीन राष्ट्रपती याच तारखेला शपथ घेत असतो. डोनाल्ड ट्रम्पही याच दिवशी व्हाइट हाऊसला येतील आणि आगामी चार वर्ष या व्हाइट हाऊसमध्ये राहतील. या व्हाइट हाऊसमध्ये जगातील प्रत्येक गोष्ट आहे. अमेरिकेच्या राष्ट्रपतींना कन्फर्ट आणि सुरक्षित ठेवणाऱ्या या वस्तू आहेत. टेक्नॉलॉजीच्या बाबतीत तर व्हाइट हाऊसला अभेद्य किल्ला मानलं जातं.
व्हाइट हाऊस ही केवळ एक इमारत नाहीये. तर सुरक्षा आणि तंत्रज्ञानाचं अद्भूत उदाहरण आहे. 1800मध्ये हाऊट हाऊस तयार करण्यात आलं होतं. व्हाइट हाऊस अमेरिकेतील असंख्य घटनांचं साक्षीदार आहे. तसेच काळानुरूप अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा विकास झाल्याने व्हाइट हाऊसची सुरक्षाही मजबूत करणं आगत्याचं होतं. त्यामुळेच सुरक्षाच्या कारणास्तव व्हाइट हाऊसमध्ये सिक्रेट सुरूंग बनवण्यात आले. आपत्कालीन किंवा संकटाच्या काळात राष्ट्रपतींसह त्यांच्या कुटुंबाला सुरक्षित ठिकाणी पोहोचवण्यासाठी या उपयोग व्हावा म्हणून व्हाइट हाऊसमध्ये सुरुंग बनवण्यात आले आहेत.
मध्यकाळात भारतापासून युरोपापर्यंतचे राजे महाराजे हे त्यांच्या किल्ल्यांमध्ये सुरुंग खोदायचे. संकटाच्या काळात याच सुरुंगाच्या वाटेनं पळून जाऊन सुरक्षित ठिकाणी जाता येईल हा त्यामागचा हेतू होता. किल्ल्यावर कोणत्याही प्रकारचा हल्ला झाला तर बचाव होण्याची संधी मिळावी म्हणून हे सुरुंग खोदलेले असत. विशेष म्हणजे या सुरुंगाची माहिती राजा व्यतिरिक्त फक्त खास लोकांनाच असायची. सुरुंगाची माहितीही सिक्रेट ठेवली जायची. जेणे करून शत्रूने किल्ल्यात येऊन हल्ला करू नये. त्यामुळेच किल्ले, गुंफा किंवा जंगलात सिक्रेट सुरुंग सापडतात. कधी कधी खोदकाम करतानाही सिक्रेट सुरुंग सापडतात. जगभरात अनेक ठिकाणी अशी सुरुंग आढळलेली आहेत. एवढेच काय हिटलरनेही अखेरच्या काळात सुरुंगाचाच आसरा घेतला होता. देशात कधी यादवी माजेल आणि कधी शत्रू राष्ट्राचा हल्ला होऊ शकतो याचा काही नेम नसतो. त्यामुळेच देशाच्या प्रमुखाच्या निवासस्थानी सिक्रेट सुरुंग तयार करण्यात आलेले असतात. व्हाइट हाऊसही त्याला अपवाद राहिलेलं नाही.
व्हाइट हाऊसमध्ये जेव्हा सुरुंग बनवण्यात आलेला नव्हता. तेव्हाही मीडिया त्याची खूप चर्चा करत होती. 1930मध्ये तर ही चर्चा अत्यंत जोरदार होती. विशेष म्हणजे त्यावेळी व्हाइट हाऊसमध्ये कोणतीच सुरुंग नव्हती. नंतर 1941मध्ये पर्ल हार्बरवर हल्ला झाल्यावर सुरक्षेची गरज निर्माण झाली. त्यानंतर व्हाइट हाऊसमध्ये सुरुंग असावा, अशी कल्पना पुढे आली आणि त्यावर काम सुरू झालं.
1940मध्ये सुरुंग निर्माम करण्यास मंजुरी मिळाली असली तरी 1950मध्ये सुरुंग बनवण्याचं प्रत्यक्ष काम सुरू झालं. तत्कालीन राष्ट्रपती हैरी एस ट्रूमॅन यांच्या कार्यकाळात हे काम सुरू झालं. त्यावेळी 150 वर्षापूर्वी बनवलेल्या या राष्ट्रपती हाऊसची अवस्था अत्यंत वाईट झालेली होती. राष्ट्रपती हाऊसच्या भिंतींना विविध ठिकाणी तडे गेलेले होते. त्यावेळी राष्ट्रपती हाऊसची इमारत पुन्हा बांधण्याचं ठरवण्यात आलं. बांधकाम सुरू करण्यापूर्वी राष्ट्रपती टुमॅन यांना जवळच्या ब्लेअर हाऊसमध्ये शिफ्ट करण्यात आलं होतं. त्या ठिकाणी तीन वर्ष ते राहिले. या काळात व्हाइट हाऊसच्या नव्या इमारतीचं बांधकाम करण्यात आलं. त्यावेळी सुरक्षेची खबरदारी म्हणून व्हाइट हाऊसमध्ये एक सुरुंगही तयार करण्यात आलं. हे सुरूंग पूर्व विंगने पश्चिम विंगला जोडण्यात आलं. त्याद्वारे सिक्रेट बंकरपर्यंत पोहोचता येत होते.
दुसरी गुप्त सुरुंग 1987मध्ये तयार करण्यात आली. रोनाल्ड रिगन तेव्हा अमेरिकेचे 40वे राष्ट्रपती म्हणून कार्यभार सांभाळत होते. रिगन यांच्या काळात दहशतवादी कारवाया वाढल्या होत्या. या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेचा उपाय म्हणून या सुरुंगची निर्मिती करण्यात आली.
व्हाइट हाऊसच्या वेबसाईटनुसार, या सुरुंगाच्या माध्यमातून राष्ट्रपती एका गुप्त शिडीपर्यंत पोहोचतात. ही शिडी ओव्हल ऑफिसजवळ आहे. या ठिकाणी गेल्यावर एक बटन दाबतात. त्यानंतर काही सेकंदातच एक गुप्त दरवाजा उघडतो. मात्र, या दरवाजात आत प्रवेश केल्यावर तिथून बाहेर कुठे निघतात ते कुणालाच माहीत नाही.
याशिवाय आणखी सुरुंग आहे. याबाबत सर्वांना माहीत आहे. हा सुरुंग ईस्ट विंगच्या तळघरातून ट्रेजरी बिल्डिंगपर्यंत जातो. अमेरिकेचे 33वे राष्ट्रपती फ्रँकलिन डी. रुझवेल्ट यांनी हा सुरुंग तयार केला होता. कोणत्याही हवाई हल्ल्याचा परिणाम होणार नाही, अशा पद्धतीने हा सुरुंग तयार करण्यात आला आहे. तिसरा सुरुंग व्हाइट हाऊसच्या जुन्या एक्झिक्युटिव्ह ऑफिस बिल्डिंगला जोडतो. हा सुरुंग अनेक ठिकाणी उघडतो असं सांगितलं जातं. या सुरुंगातून व्यक्ती सुरक्षित आणि अज्ञातस्थळी पोहोचू शकतो. पण याबाबत कोणताही पुरावा नाही. तसेच या सुरुंगबाबत कोणीही दुजोरा दिलेला नाही.
व्हाइट हाऊसच्या गुप्त सुविधांना राष्ट्रपती एमर्जन्सी ऑपरेशन सेंटर (PEOC) म्हटलं जातं. त्याशिवाय GSA (जनरल सर्व्हिसेस अॅडमिनिस्ट्रेशन) संस्था सरकारी इमारतींची सुरक्षा सुनिश्चित करते. तसेच गुप्त तळघर आणि सुरुंगांची निर्मिती करते.
मीडिया रिपोर्टनुसार, या सुरुंगांची निर्मिती पूर्णपणे गुप्त ठेवलेली आहे. त्यावेळे सुरुंग निर्माण करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे फोनही टॅप केले जात होते. या ठिकाणच्या गुप्त सुरुंगांच्या भिंती इतक्या मोठ्या काँक्रिटने बनवलेल्या आहेत की त्यावर अणू बॉम्ब टाकला तरी काही फरक पडणार नाही. तसेच कोणत्याही प्रकारच्या रेडिएशनचा त्यावर काहीच परिणाम होत नाही. तसेच भूमिगत झाल्यावर या तळघरात आणि सुरुंगांमध्ये पुरेसं ऑक्सिजन मिळेल याचीही व्यवस्था करण्यात आलेली आहे. या सुरुंगामध्ये नेहमीच पुरेसं अन्न ठेवलेलं असतं. आपत्कालीन परिस्थितीत अनेक महिने पुरेल इतके खाद्यपदार्थ या ठिकाणी ठेवलेले आहेत.
डोनाल्ड ट्रम्प यांनी 2017मध्ये जेव्हा सत्ता हाती घेतली तेव्हा त्यांना आणि काही उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना या सुरक्षा व्यवस्थेची माहिती देण्यात आली होती. त्याच प्रकारे जेव्हा बायडन अमेरिकेचे राष्ट्रपती बनले तेव्हा त्यांनाही या सुरुंगांची माहिती देण्यात आली होती. अमेरिकेच्या राष्ट्रपतीपदाची शपथ घेणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला या गुप्त सुरुंगांची माहिती दिली जाते.
व्हाइट हाऊसचे ये गुप्त सुरुंग राष्ट्रपतीच्या एमर्जन्सी ऑपरेशन सेंटरचा एक भाग मानलं जातं. ही केवळ एक संरचना नाही तर अमेरिकेच्या सुरक्षेचं प्रतिक आहे. या सुरक्षेमुळेच व्हाइट हाऊसला एक अभेद्य किल्लाही म्हटलं जातं. व्हाइट हाऊसमधील हे गुप्त सुरुंग केवळ तंत्रज्ञानाचा भाग नाही तर राष्ट्रपती आणि त्यांच्या कुटुंबाच्या सुरक्षेचा एक महत्त्वाचा हिस्सा आहेत. राष्ट्रपती, त्यांचे कुटुंबीय आणि त्यांची टीम आपत्कालीन परिस्थिती सुरक्षित राहिली पाहिजे याची खबरदारी या सुरुंगाद्वारे घेतली जाते. त्यामुळेच अमेरिकेच्या व्हाइट हाऊसमधील हे गुप्त सुरुंग जगातील सर्वात सुरक्षित ठिकाणांपैकी एक मानले जातात.