मोहम्मद अली जिना यांचा जन्म 25 डिसेंबर 1876 रोजी एका गुजराती कुटुंबात झाला. जसे ते जन्माला आले, त्यांच्या नावासोबत भाई या शब्द लावण्यात आला. त्याचं नाव मोहम्मद अली जिनाभाई असं होतं. जिन्ना 18 वर्षांचे झाल्यावर त्यांनी 2 मोठे निर्णय घेतले. त्यातील पहिला निर्णय होता, त्यांनी सर्वात आधी आपल्या नावाचं स्पेलिंग बदललं. ( Why did Muhammad Ali Jinnah remove the word ‘Bhai’ from his name? Hindu Takkhar Family then converted to Islam.)
दुसरी गोष्ट त्यांनी केली, ती म्हणजे त्याच्या नावाच्या मागे लागलेला ‘भाई’ हा शब्द काढून टाकला. उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला जाण्यापूर्वीच त्यांनी हे काम केलं. भाई हा शब्द काढण्यामागे एक समज होता, हा समज की ज्या व्यक्तीच्या नावामागे भाई आहे, तो हिंदू असेल. हीच ओळख जिन्ना यांना नको होती, मात्र, त्यांच्या कुटुंबातील इतर सर्व पुरुष सदस्यांच्या नावामागे भाई हा शब्द कायम राहिला.
पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिन्ना यांचे वडील हिंदू कुटुंबात जन्माला आले. पण एका घटनेमुळे त्यांनी धर्म बदलला आणि मुस्लीम धर्म स्वीकारला. त्यांनी धर्मच बदलला नाही तर त्याचं पालनही केलं, आणि आपल्या मुलांनाही त्याच धर्माची शिकवण दिली.
जिन्ना कुटुंब मूळचं गुजरातमधील काठियावाडचं. गांधीजी आणि जिन्ना या दोघांची पायमूळं याच भूमीतली. त्यांच्या आजोबांचे नाव प्रेमजीभाई मेघजी ठक्कर. ते हिंदू होते. ते काठियावाडमधील पनेली गावचे ते रहिवासी. प्रेमजी भाईंनी मत्स्य व्यवसायातून भरपूर पैसे कमवले. त्या काळी त्यांच्या परदेशातही व्यापार होत होता. पण ते ज्या जातीसमुदायातून येत होते, त्या लोहना जातीसमुदायाला त्यांचा हा व्यवसाय आवडला नाही.
म्हणून जेव्हा प्रेमजीभाईंनी माशांचा व्यवसाय सुरू केला आणि त्यांनी त्यातून पैसे कमवायला सुरुवात केली, तेव्हा त्यांच्याच जातीतील लोकांनी त्याला विरोध केला. त्यांना सांगण्यात आलं की, जर तुम्ही माशांचा व्यवसाय बंद केला नाही, तर तुम्हाला जातीतून बहिष्कृत केलं जाईल. प्रेमजींनी व्यवसाय चालू ठेवत जातीत परत येण्याचा प्रयत्न केला पण ते यशस्वी झाले नाहीत. लोकांचा बहिष्कार चालूच राहिला. अकबर एस अहमद यांच्या जिन्ना, पाकिस्तान एंड इस्लामिक आयडेंटीटी या पुस्तकात याबद्दलची अधिक माहिती दिली आहे.
या बहिष्कारानंतरही, प्रेमजी हिंदूच राहिले, पण त्यांचा मुलगा पुंजालाल ठक्करला त्याच्या वडिलांचा आणि कुटुंबाचा बहिष्कार इतका अपमानास्पद वाटला की, त्यांनी रागाच्या भरात पत्नीसह त्याच्या चार मुलांचाही धर्म बदलला. ते मुसलमान झाले. मात्र, प्रेमजींचे बाकी मूलं हे हिंदू धर्मातच राहिले. यानंतर जिनाचे वडील पुंजालाल हे कुटुंबापासून तुटले गेले आणि ते काठियावाडहून कराचीला आले.
कराचीला जिन्नांच्या वडिलांचा व्यवसाय भरभराटीला आला. तो इतका समृद्ध झाला की, त्याच्या कंपनीचे कार्यालय त्यांनी थेट लंडनमध्ये उघडलं. असे म्हटले जाते की, जिनांचे बरेच नातेवाईक अजूनही हिंदू आहेत आणि गुजरातमध्ये राहतात.
हेही वाचा: