ऑफलाइन स्टोर (Offline Stores) असो की ऑनलाइन शॉपिंग जास्तीत जास्त वस्तूंच्या किंमतीच्या लेबलवर शेवटी 99 रुपये असे लिहलेले असते. काही असे सुद्धा स्टोअर आहेत जेथे प्रत्येक वस्तू फक्त 99 रुपयांना उपलब्ध केली जाते. तुमच्या मनात कधी असा प्रश्न आला आहे का की प्रत्येक वस्तू फक्त 99 रुपयांनाच का ठेवली जाते काय नेमके त्यामागे कारण असते. हे कारण समजून घेण्यासाठी अनेक शास्त्रज्ञांनी संशोधन देखील केले आहे. या संशोधनाच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला की, या वस्तूचा ग्राहकांवर (Consumer Behavior) नक्की काय परिणाम होतो, तसेच ऑफलाईन किंवा ऑनलाइन ( Online Stores) स्टोर चालवणाऱ्या दुकानदारांचा, एकंदरीत टर्न ओव्हर किती असतो. चला तर मग जाणून घेऊया या किमतीचा ग्राहकांवर कशाप्रकारे परिणाम होतो.
संशोधकांनी जे रिपोर्ट सादर केलेले आहेत त्यामध्ये असे सांगण्यात आले आहे की, किंमतीवर लावण्यात आलेल्या 99 किंवा 999 अशा प्रकारच्या लेबलचा असा थेट ग्राहकांच्या मानसिकतेवर परिणाम होत असतो आणि अशा वेळी त्यांचा वस्तूकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो आणि म्हणूनच अनेकदा ग्राहक अशा प्रकारच्या वस्तू विकत घेण्यासाठी पुढे येतात. एकंदरीत समोर आलेल्या निष्कर्षामुळे ग्राहक अशा प्रकारच्या वस्तू का विकत घेण्याचा प्रयत्न करतात जाणून घेऊया त्यामागील कारण.
लाइव्ह सायंसच्या रिपोर्टनुसार असे अनेक देशांमध्ये केले जाते. फ्रीड हार्डेमेन यूनिवर्सिटी चे मार्केटिंग एसोसिएट प्रोफेसर ली ई हिब्बेट यांच्या मते कोणत्याही वस्तूच्या किमतीवर rs.99 लिहिलेले असणे हे एक थिअरीचा भाग आहे. प्रत्येक व्यक्ती लेबलवर लिहिलेल्या वस्तूला डाव्या बाजूने वाचत असतो आणि म्हणूनच अशा वेळी व्यक्तीच्या मेंदूवर त्याचा परिणाम जाणवत असतो आणि व्यक्ती नेहमी पहिला अंक जास्त लक्षात ठेवतो यासाठी दुकानदार शेवटी 99 अंकाचा उपयोग करतात जेणेकरून त्यांना त्याची किंमत त्याप्रमाणे दिसावी याचे एक उदाहरण आपण समजून घेऊया.
जसे की समजा एखाद्या वस्तूची किंमत 500 रुपये आहे परंतु त्या वस्तूची किंमत 499 रुपये असे लिहिले असेल तर अशावेळी व्यक्तीच्या डोक्यात त्या वस्तूची किंमत 400 रुपये राहते रूपये 99 असणाऱ्या किमतीवर व्यक्ती जास्त लक्ष केंद्रित करत नाहीत. मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून पाहायला गेले तर अशावेळी व्यक्तीला 500 रुपये हे 499 च्या तुलनेमध्ये खूपच कमी वाटतात तसे पाहायला गेले तर या किमतीतील फरक फक्त 1 रुपयाचा असतो. हार्वर्ड बिजनेस रिव्यूच्या रिपोर्टनुसार सेल दरम्यान वस्तूच्या किंमती व जो लेबल लावलेला असतो तो प्रामुख्याने आपल्याला रूपये 99 असा लिहिलेला दिसतो अशातच ग्राहक वस्तू विकत घेताना त्या लेबल वरच जास्त लक्ष देत असतात. रुपये 99 लिहिलेल्या किमतीवर पाहून या वस्तूची किंमत कमी आहे अशा प्रकारचा समज त्यांच्या मनामध्ये निर्माण होतो आणि ती वस्तू विकत घेण्याचा ग्राहक प्रयत्न करत असतात.
रिपोर्ट नुसार रुपये 99 ला विकल्या जाणाऱ्या वस्तूमुळे दुकानदाराला एक महत्वाचा फायदा सुद्धा होत असतो यासाठी आपण एक उदाहरण समजून घेऊ या. जर एखादा ग्राहक 599 रुपयेचे सामान खरेदी करत असेल तर अशावेळी आपण कॅश पेमेंट करतो त्यावेळी 600 रुपये आपण दुकानदाराला देतो.अनेकदा तुम्ही एक गोष्ट पाहिली असेल की अनेक दुकानदार उरलेला 1 रुपया तुम्हाला परत करत नाहीत त्याचबरोबर ग्राहक सुद्धा उरलेला 1 रुपया त्यांच्याकडून मागत नाही. अनेकदा असे होते की दुकानदार 1 रुपयाच्या बदल्यात तुम्हाला एखादे चॉकलेट देत असतात. अशाप्रकारे दुकानदार 1 रुपया वाचवत असतात. व याच पैश्याने आपले एखादे दुसरे उत्पादनसुद्धा ग्राहकांना विकत असतात. संशोधकांचे असे म्हणणे आहे की वस्तूंच्या किमतीवर लिहिलेले रुपये99 ग्राहकांच्या व्यवहार शैलीला बदलतो म्हणूनच ही रणनीती मार्केटिंगमध्ये प्रामुख्याने वापरली जाते मानसिक दृष्ट्या पाहायला गेले तर या रणनीतीचा खूपच मोठ्या प्रमाणावर फायदा सुद्धा मिळतो ,असा निष्कर्ष संशोधनाअंती सिद्ध झालेला आहे.
UPSC IAS Exam 2022 : कुठे भरायचा अर्ज? कधीपर्यंत भरता येणार फॉर्म? जाणून घ्या सगळंकाही!!!
हॉट एयर बलूनची सफारी का आहे इतकी महागडी? यामध्ये काय असतं खास?