हॉट एयर बलूनची सफारी का आहे इतकी महागडी? यामध्ये काय असतं खास?
Why Is A Hot Air Balloon Ride So Expensive? : आग्रा, पुष्कर आणि लोणावळा बरोबरच देशाच्या अन्य भागात हॉट एयर बलूनची राईड आपण एन्जॉय करू शकतो यासाठी हजारो रुपये चार्ज केले जातात. परंतु कधी विचार केला आहे का ही सफारी इतकी महाग का असते? चला तर मग जाणून घेऊया या मागील मजेशीर कारण...
1 / 5
आग्रा, पुष्कर आणि लोणावळा बरोबरच देशाच्या अन्य भागात हॉट एयर बलूनची (Air Balloon Ride) राईड आपण एन्जॉय करू शकतो, यासाठी हजारो रुपये चार्ज केले जातात. परंतु कधी विचार केला आहे का ही सफारी इतकी महाग का असते? आउटडोर ट्रूफ यांच्या रिपोर्टनुसार, हॉट एयर बलून राईड महागडी होण्यामागील अनेक वेगवेगळी कारणे आहेत यामुळे पर्यटकांना (tourist) जास्त पैसे (high pay) द्यावे लागतात जाणून घ्या या मागील मजेशीर कारण..
2 / 5
रिपोर्टनुसार ही राईड एवढी महाग असण्यामागे सर्वात मोठे कारण म्हणजे याचा मेंटेनन्स (maintainance) आणि ऑपरेट करण्याचा खर्च. जसे की, अशा प्रकारची अॅक्टिव्हिटी जेथे केली जाते तिकडचा खर्च आणि एकंदरीत हे बलून ठेवण्यासाठी लागणारा खर्च या सर्व गोष्टींचा एकंदरीत समावेश असतो त्याचबरोबर हॉट एयर बलून मध्ये जे बास्केट लावलेलं असतं त्या बास्केटमध्ये अनेक जण एका वेळी उभे राहतात. त्या बास्केटची किंमत सुध्दा जास्त असते आणि म्हणूनच एकंदरीत याची निगा राखण्यासाठी व देखभाल करण्यासाठी कंपनीला अधिक जागेची आवश्यकता असते.
3 / 5
एका हॉट एयर बलूनची किंमत 14 ते 60 लाख रुपये एवढी असते त्याचबरोबर या हॉट एअर बलूनच्या आकारावर सुद्धा याची किंमत ठरवली जाते. जेवढा आकार मोठा असेल तेवढी त्याची किंमत सुध्दा जास्त असते. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी आपल्याला फक्त हॉट एयर बलूनची गरज भासत नाही तर अनेक इक्विपमेंट सुद्धा आपल्याला गरजेचे असतात आणि म्हणूनच जर तुम्हीसुद्धा हा व्यवसाय सुरू करण्याचा प्लॅन करत असाल तर तुमच्याकडे अन्य साधन सामग्री असणे आवश्यक आहे म्हणूनच पर्यटकांकडून अधिक पैसे चार्ज केले जातात.
4 / 5
रिपोर्टनुसार ही राईड महागडी असण्याचे अजून एक कारण सुद्धा सांगितले जाते ते म्हणजे मेंटेनन्स. बलूनची देखभाल व निगा राखण्यासाठी खूप सार्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते त्याचबरोबर जर आपण या बलूनची देखभाल व्यवस्थित रित्या घेतली नाही तर हा बलून डॅमेज होण्याचा धोका अधिक असतो. जेव्हा एखादा शहरामध्ये हा व्यवसाय आपल्याला करायचा असेल तेव्हा आधी या बलूनची टेस्टिंग केली जाते त्यानंतर तुम्ही बलून राईड बिजनेस ओपन करू शकता. बलून टेस्टिंग केल्यानंतर बलून किती सुरक्षित आहेत याबद्दल सांगितले जाते तसेच याशिवाय अनेक मोठ्या कंपन्या या बलूनची देखभाल करण्यासाठी मेकॅनिक सुद्धा ठेवतात जेणेकरून इमर्जन्सी परिस्थितीमध्ये हा बलून हँडल केला जाईल.
5 / 5
त्याचबरोबर इंधन आणि कर्मचाऱ्यांचा खर्चसुद्धा कमी नसतो. हॉट एअर बलून राईड मध्ये मोठ्या प्रमाणावर गॅसचा उपयोग इंधन म्हणून केला जातो. त्यामुळे राईड चार्ज एकंदरीत त्यावेळी गॅसची किंमत काय आहे यावर अवलंबून असते तसेच या कामांमध्ये कर्मचाऱ्यांची संख्या सुद्धा जास्त असते, जे वेगवेगळ्या प्रकारचे काम सांभाळत असतात अशा प्रकारे हॉट एअर बलून राईडची किंमत प्रत्येक वर्षी सतत वाढत असते.