Drinking Alcohol In Car : आपल्यापैकी प्रत्येकाला माहिती आहे की, सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणे (Drinking Alcohol In Public Place) अपराध आहे. तुम्ही पाहिले असेल की, अनेकदा लोक मज्जा-मस्ती म्हणून आपल्या कारमध्ये बसून दारू सेवन करत असतात. काही जण ड्रायव्हिंग करत असताना सुद्धा दारू सेवन करतात, असे करणे चुकीचे आहे. अनेकांचे असे म्हणणे असते, की कार ही गाडी त्यांची स्वतःच्या मालकीची असते आणि जर कारमध्ये बसून दारू सेवन केल्यास त्यात वाईट तरी काय?? असा प्रश्न सुद्धा अनेकांच्या मनामध्ये निर्माण होतो. अनेक लोकांचे असेदेखील म्हणणे आहे, की कारमध्ये बसून दारू सेवन करणे (Drinking Alcohol In Car) अपराध आहे म्हणूनच आज आपण या लेखांमध्ये एक महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत. कार पब्लिक प्लेस (Car is Public Place) आहे की प्रायव्हेट प्लेस आहे, याबद्दल अनेकांच्या मनामध्ये शंका निर्माण होत असते. या शंकाचे निरसनसुद्धा आपण करणार आहोत. सोबतच कारमध्ये बसून दारू सेवन करणे कायदेशीर आहे की बेकायदेशीर…? याबद्दल देखील सविस्तरपणे जाणून घेणार आहोत, चला तर मग जाणून घेऊ या त्याबद्दल…
कारमध्ये दारू सेवन करणे बेकायदेशीर आहे की नाही, याबद्दल जाणून घेण्याआधी आपल्याला कार ही पब्लिक प्लेस आहे की प्रायव्हेट प्लेस आहे याबद्दल जाणून घेणे गरजेचे आहे. हा फरक जाणून घेतल्यावर आपल्याला कळेल, की कारमध्ये बसून मद्यपान करणे कोणत्या कॅटेगरीमध्ये येते.
कारला पब्लिक किंवा प्रायव्हेट स्पेस मानणे हा देखील एक चर्चेचा विषय आहे. कोर्टाने देखील कारला पब्लिक आणि प्रायव्हेट प्लेस दोन्हीही मानले आहे. तसे पाहायला गेले तर त्या परिस्थितीवर अवलंबून असते, की कार कोणत्या ठिकाणी आणि वेळी उभी करण्यात आली आहे. सर्वसाधारणपणे असे मानले जाते, की जर कार तुमच्या घरातून निघून रस्त्यावर चालत आहे किंवा रस्त्यावर उभी आहे तर अशावेळी तुमची कार एखाद्या सार्वजनिक रस्त्यावर उभी असेल तर त्या वेळेस कारला पब्लिक स्पेस मानले जाते, अशावेळी आपण कारमध्ये बसून कोणतेच चुकीचे कार्य करू शकत नाही, जे सार्वजनिक ठिकाणी करण्यास बंदी केली गेली आहे.
दिल्ली हायकोर्टाचे वकील प्रेम जोशी यांनी सांगितले, की नुकतेच काही दिवसापूर्वी कारमध्ये मास्क लावण्याबद्दल मोठी चर्चा झाली होती. अशा वेळी दिल्ली हायकोर्टाने सौरभ शर्मा विरुद्ध दिल्ली सिटी केसमध्ये रस्त्यावर चाललेल्या कारला पब्लिक स्पेस मानले होते आणि अशा वेळी पब्लिक स्पेस मानल्यामुळे मास्क लावणे अनिवार्य केले गेले होते. तसे तर कारला प्रायव्हेट प्लेस मानणे हे एक मिक्स्ड क्यूशन ऑफ लॉ आहे. हे एकंदरीत त्या जागेवर अवलंबून असते की कार सार्वजनिक ठिकाणी आहे की नाही.
अॅडव्होकेट जोशी यांच्या मते, खरेतर अनेकदा कोर्टाकडून कायद्याबद्दलच्या अशा काही व्याख्या वेगवेगळ्या स्थितीत निर्माण होतात. त्या स्थितीला स्वतः न्यायपालिका खंडन करते. जसे की दिल्ली हायकोर्टाने कारला पब्लिक प्लेस सांगितले होते. परंतु 2021मध्ये बुटा सिंह विरुद्ध स्टेट ऑफ हरयाणा केसमध्ये सुप्रीम कोर्टाने कारला एनडीपीसीएच्या सेक्शन 43नुसार प्रायव्हेट प्लेस मानले होते.
प्रेम जोशी यांच्या मते , भारतीय कायदा रस्त्यावर उभी असलेली कार किंवा रस्त्यावर चालत असलेली कारला ही एकंदरीत पब्लिक प्लेस मानते. जर तुमची कार रस्त्याच्या कडेला उभी आहे आणि जर तुम्ही त्या कारमध्ये बसून दारू सेवन करत असाल तर अशावेळी हे कृत्य बेकायदेशीर मानले जाते. जर तुमची कार प्रायव्हेट प्लेसमध्ये उभी असेल तर तुम्ही त्या कारमध्ये बसून दारू सेवन करू शकता. जसे की तुमची कार तुमच्या पार्किंगमध्ये आहे तर अशावेळी तुम्ही त्या कारमध्ये बसून दारू सेवन करू शकतात.