असा एक देश जिथे रस्ते आहेत निळे! या रंगामागे कारण काय?

| Updated on: Mar 01, 2023 | 5:07 PM

जगात बहुतेक ठिकाणी आपल्याला रस्ते काळे दिसतील. भारतात कुठेही गेलात तरी रस्ते काळे दिसतीलच, पण एक देश असाही आहे जिथे रस्ते काळे नसून निळ्या रंगाचे आहेत.

असा एक देश जिथे रस्ते आहेत निळे! या रंगामागे कारण काय?
Blue roads in quatar
Image Credit source: Social Media
Follow us on

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉन एफ केनेडी एकदा म्हणाले होते की, अमेरिकेचे रस्ते चांगले आहेत कारण अमेरिका एक विकसित आणि समृद्ध देश आहे म्हणून नाही, तर अमेरिकन रस्ते चांगले आहेत म्हणून अमेरिकेचा विकास झालाय. देशाच्या विकासात रस्त्यांचा मोठा वाटा असतो. जगात बहुतेक ठिकाणी आपल्याला रस्ते काळे दिसतील. भारतात कुठेही गेलात तरी रस्ते काळे दिसतीलच, पण एक देश असाही आहे जिथे रस्ते काळे नसून निळ्या रंगाचे आहेत. आश्चर्य वाटण्याची गरज नाही, तुम्ही बरोबर वाचले आहे. एक देश असाही आहे जिथे रस्ते काळे नसून निळ्या रंगाचे आहेत.

कोणता देश?

जेव्हा जेव्हा जगातील सर्वात लोकप्रिय गेमचे नाव येते फुटबॉलला अव्वल स्थान दिले जाते. त्याची बक्षिसाची रक्कमही इतर कोणत्याही खेळापेक्षा जास्त आहे. नुकतीच कतारमध्ये फिफा विश्वचषकाची सांगता झाली आणि या देशाचीही चर्चा झाली. कतारची राजधानी दोहामध्ये तुम्हाला निळे रस्ते पाहायला मिळतील. काळ्या रस्त्यांच्या तुलनेत निळ्या रस्त्यांवरील तापमान 20 टक्क्यांपर्यंत कमी असते. त्यांचे रीडिंग टिपण्यासाठी रस्त्यांवर सेन्सरही लावण्यात आले आहेत.

काय म्हणतात संशोधक ?

कतारची राजधानी दोहामधील जुने रस्ते निळ्या रंगात रंगवण्यात आले आहेत. येथील रस्ते निळ्या रंगाने रंगविण्यामागे कारण देण्यात आले आहे की यामुळे येथील तापमान नियंत्रित करणे सोपे होईल. ग्लोबल वॉर्मिंगच्या समस्येशी झगडत असलेल्या जगात रस्ते रंगवण्याचा पायलट प्रोजेक्ट कतारने सुरू केला आहे. रस्त्यांना निळा रंग देऊन सूर्यापासून उत्सर्जित होणारे रेडिएशन 50 टक्क्यांनी कमी करता येऊ शकते, असे संशोधकांचे मत आहे.