मुंबई: रेंगाळणाऱ्या प्राण्यांमध्ये साप हा एक असा प्राणी आहे जो समोर पाहिल्यावर आपण भीतीने थरथरतो. विशेषत: जेव्हा तो हिस्स्स्स्स असा आवाज काढतो तेव्हा प्रत्येकजण घाबरून जातं. आश्चर्याची बाब म्हणजे हा आवाज काढण्यासाठी साप जीभ वापरत नाही. मग साप असा आवाज कसा आणि का काढतो? आज आपण याच विषयावर बोलणार आहोत.
तज्ज्ञांच्या मते, साप जेव्हा हिस्स्स्स्स आवाज काढतो, तेव्हा तो त्याचे रक्षण करण्याचा एक मार्ग असतो. सापाला जेव्हा जेव्हा धोका वाटतो, तेव्हा तो इतरांना स्वतःपासून दूर राहण्याचा इशारा देणारा हिस्स्स्स्स आवाज काढतो. किंबहुना, हा त्याच्या संरक्षण करण्याचा एक महत्त्वाचा भाग आहे, जो तो आपत्कालीन परिस्थितीत वापरतो.
सापांच्या वर्तनावर संशोधन करणाऱ्या तज्ज्ञांच्या मते, इतर वन्य प्राण्यांप्रमाणे सापांनाही धोका दिसल्यावर सुरुवातीला स्वत:चे रक्षण करण्याचा प्रयत्न करतात. त्यासाठी तो आपल्या बिळात वेगाने जातो किंवा कुठेतरी लपण्याचा प्रयत्न करतो. यानंतरही धोका अजून टळलेला नाही असं त्याला वाटतं, मग तो हिस्स्स्स्स आवाज काढू लागतो.
सर्पतज्ज्ञांचे म्हणणे आहे की, जर तुम्हाला कुठून तरी सापाचा आवाज येत असेल तर सावध व्हायला हवे. याचा अर्थ असा की साप आपल्या आजूबाजूला आहे आणि तो आपल्याला धोका मानून हल्ल्याची तयारी करत आहे. अशा वेळी शांतपणे तिथून निघून जायला हवं. जर असे केले नाही तर तो वेगाने हल्ला करू शकतो. आवाज ऐकू येताच सतर्क व्हावे.