142 रेल्वे स्टेशन, 87 शहरे…जगातील सर्वात लांब रेल्वे प्रवास, रेल्वेत बसल्यावर आठवड्याभरात पोहचणार

| Updated on: Sep 02, 2024 | 3:47 PM

Longest Train Journey: रेल्वेचा सर्वात लांब प्रवास किती तासांचा असणार? हा प्रश्न विचारल्यावर दोन, तीन दिवस असे उत्तर तुम्ही देणार...परंतु एक रेल्वेला सोर्स स्टेशन ते डेस्टिनेशनपर्यंत पोहचण्यासाठी आठवडाभर लागतो. जगातील सर्वात लांब रेल्वे मार्ग हा आहे. आठवडाभराच्या या प्रवासात तुम्ही बोर होणार नाही, कारण भरभरुन निसर्ग सौंदर्यं तुम्हास बघण्यास मिळणार आहे.

1 / 6
जगातील सर्वात लांब रेल्वे ट्रान्स-सायबेरियन रेल्वेचा आहे. ही रेल्वे रशियातील राजधानी मॉस्कोच्या पूर्वेस असलेले शहर व्लॉडीवोस्तोकला जोडता. या प्रवासासाठी सात दिवस लागतात. बुलेट ट्रेनने हा प्रवास केला तरी अधिक वेळ लागणार आहे.

2 / 6
ट्रान्स-सायबेरियन रेल्वे मार्ग तब्बल 9259 किमी लांब आहे. हा मार्ग पूर्ण करण्यासाठी सात दिवस लागतात. हा प्रवास 166 तासांचा आहे. या मार्गावरुन चीनची बुलेट ट्रेन 460 किमी वेगाने चालवली तरी 20 तास लागणार आहे.  भारताची वंदे भारत ट्रेन 160 किमी वेगाने धावली तरी तिला 58 तास लागतील.

3 / 6
ट्रान्स-सायबेरियन रेल्वे मार्गावर 142 रेलवे स्टेशन आहेत. मॉस्को ते ब्लादिवोस्टक दरम्यान 87 शहरांमधून ही रेल्वे जाते. ट्रान्स-सायबेरियन रेल्वेकडून इतक्या लांब मार्गावर केवळ दोनच रेल्वे चालवल्या जातात.

4 / 6
ट्रान्स-सायबेरियन रेल्वेनंतर जगातील दुसरा लांब रेल्वे मार्ग कॅनडात आहे. कॅनडातील टोरंटोमधील वॅकूवरला जोडणारा रेल्वे मार्ग 4,466 किमी लांब आहे. हा प्रवास पूर्ण करण्यासाठी चार दिवस लागतात.

5 / 6
ट्रान्स-सायबेरियन रेल्वे आणि कॅनडानंतर तिसऱ्या क्रमांकाचा लांब रेल्वे मार्ग चीनमध्ये आहे. हा मार्ग चीनची आर्थिक राजधानी शंघाईला तिबेटमधील ल्हासा या शहराला जोडतो. या रेल्वे मार्गाची लांबी 4373 किमी आहे. हा प्रवास पूर्ण करण्यासाठी 46 तास 44 मिनिटे लागतात.रशिया, कॅनडा, चीननंतर चौथा क्रमांकाचा लांब रेल्वे मार्ग ऑस्ट्रेलियामध्ये आहे. हा रेल्वे मार्ग ऑस्ट्रेलियातील सिडनी ते पर्थ असा जोडला जातो. हा मार्ग 4352 किमी आहे.

6 / 6
जगातील पाचवा लांब रेल्वे मार्ग भारतात आहे. भारतातील हा मार्ग 4,237 किमी आहे. या मार्गावरुन विवेक एक्सप्रेस धावते. हा मार्ग पूर्ण करण्यासाठी 72 तास लागतात. आसाममधील डिब्रूगढ ते तामिळनाडूमधील कन्याकुमारी असा हा मार्ग आहे.