मुंबई: तब्बल अडीच महिन्यांच्या कालावधीनंतर राज्यातील कोरोना निर्बंध आजपासून शिथील होणार आहेत. आज सकाळपासून मुंबई, पुणे आणि राज्यातील प्रमुख शहरांमध्ये अनलॉकिंगच्या (Unlocking) प्रक्रियेला सुरुवात झाली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने राज्यातील जिल्ह्यांची पाच स्तरांमध्ये वर्गवारी केली आहे. (5 Level Unlock Plan Begins Today in maharashtra )
त्यानुसार पहिल्या स्तरात 10 जिल्हे असून याठिकाणी लॉकडाऊन पूर्णपणे हटवण्यात आला आहे. तर दुसऱ्या स्तरातील जिल्ह्यांमध्ये 50 टक्के निर्बंध शिथील होणार आहेत. तिसऱ्या स्तरातील 15 जिल्ह्यांमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता इतर निर्बंध कायम राहतील. तर चौथ्या आणि पाचव्या स्तरातील जिल्ह्यांना कोरोना निर्बंधांमधून कोणतीही सूट दिली जाणार नाही.
?पहिल्या लेवलमधील जिल्हे
अहमदनगर, चंद्रपूर, धुळे, गोंदिया, जळगाव, जालना, लातूर, नागपूर, नांदेड, यवतमाळ
?दुसऱ्या लेव्हलमधील जिल्हे
हिंगोली, नंदुरबार
?तिसऱ्या लेव्हलमधील जिल्हे
मुंबई उपनगर, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, अकोला, अमरावती, बीड, भंडारा, गडचिरोली, उस्मानाबाद, पालघर, परभणी, सोलापूर, वर्धा, वाशिम
?चौथ्या लेव्हलमधील जिल्हे
पुणे, बुलडाणा, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग
?पाच लेव्हल कशा आहेत??
?पहिली लेव्हल : पॉझिटिव्हीटी रेट पाच टक्के, तसेच ऑक्सिजन बेड 25 टक्क्यांपेक्षा कमी व्यापलेले असावेत.
?दुसरी लेव्हल : पॉझिटिव्हीटी रेट 5 टक्के ऑक्सिजन बेड्स 25 ते 40 टक्क्यांदरम्यान व्यापलेले असावेत.
?तिसरी लेव्हल : पॉझिटिव्हीटी रेट 5 ते 10 टक्के असावा. ऑक्सिजन बेड्स हे 40 टक्क्यांपेक्षा जास्त व्यापलेले असतील
?चौथी लेव्हल : पॉझिटिव्हीटी रेट 10 ते 20 टक्के असेल. तसेच येथे ऑक्सिजनचे बेड 60 टक्क्यांच्या वर व्यापलेले असतील तर
?पाचवी लेव्हल : पॉझिटिव्हीटी रेट 20 टक्क्यांच्या वर आणि ऑक्सिजन बेड हे 75 टक्क्यांपेक्षा जास्त प्रमाणात व्यापलेले असतील
संबंधित बातम्या :
Mumbai Unlock: लॉकडाऊन उठताच मुंबईत ट्रॅफिक जॅम; रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा
Pune Unlock: पुण्यातील निर्बंध उठणार, जाणून घ्या काय सुरु आणि काय बंद राहणार
(5 Level Unlock Plan Begins Today in maharashtra )