पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात येत्या3 जानेवारीला सावित्रीबाईंचा पुतळा स्थापन करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे विद्यापीठात आता सावित्रीबाईचा पुतळा पाहायला मिळणार असणार असल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.
३ जानेवारीला स्थापनेची शक्यता
पुणे विद्यापीठाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ असे नाव दिले. मात्र विद्यापीठात सावित्रीबाईंचा पुतळा नाही. त्यामुळे सावित्रीबाईंचा पुतळा बसवण्याची मागणी जोर धरत होती. त्यामुळे विद्यापीठाच्या आवारात सावित्रीबाईंचा पुतळा असावा यासाठी विद्यापीठ व सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. पुतळा बनवण्यासाठी टाकला आहे. तो लवकरच तयार होईल. सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिनी म्हणजे 3 जानेवारी रोजी या पुतळ्याची स्थापना करण्यात यावी असं पुतळा कमिटीच्या सदस्यांचं मत असल्याची माहिती छगन भुजबळ यांनी दिली आहे. विद्यापीठाच्या आवारात डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले असे अनेक पुतळे आहेत.
विद्यापीठाची ओळख ही सावित्रीबाईंच्या नावाने आहे. त्यामुळे विद्यापीठातील मुख्य इमारत केंद्रस्थानी मानून सावित्रीबाईंचा पुतळा बसवण्याबाबत सुचवण्यात आले आहे. मात्र संबधित पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत अंतिम निर्णयात घेण्यात येईल अशी माहीतीही त्यांनी दिली आहे. विद्यापीठात आयोजित केलेल्या कार्यक्रमाला त्यांनीही हजेरी लावली होती त्यावेळी ते बोलत होते.
संघटनांमध्ये मतभेद नाहीत
काही दिवसांपूर्वी सावित्रीबाई फुलेचा पुतळा जोतिबांच्या पुतळ्या शेजारी बसावा. यासाठी महात्मा फुलेंच्या पुतळ्या शेजारची जागा देण्याची मागणी काही संघटनानी केली होती. यावरून संघटनांमध्ये मत भेदही झाले होते. मात्र आज स्वत: छगन भुजबळ यांनी भेट देत जागेची पाहणी केली. संघटनांमध्ये कोणत्याही प्रकारचा मतभेद नसल्याची माहितीही दिली.
संबंधित बातम्या
Malegaon Violence: रझा अकादमीवरील छापेमारीत महत्त्वाचे पुरावे हाती, 52 जणांना बेड्या!