मनमाड : नागरी वस्त्यात घुसून बिबटे हल्ले करीत असल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. मात्र, आता लांडगेदेखील गावात शिरून माणसांवर हल्ला करू लागले आहेत. अशीच एक घटना आज (शुक्रवार) सकाळी मनमाडपासून जवळ असलेल्या हिसवळ बुद्रुक इथं घडली. शेतात जाणाऱ्या चार जणांवर पिसाळलेल्या लांडग्यांने हल्ला केला असून त्यात दोन महिला आणि दोन पुरुष गंभीर जखमी झाले आहेत. (A wolf attack in Manmad four seriously injured)
मिळालेल्या माहितीनुसार, जखमींना मनमाडच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या घटनेमुळे हिसवळ गाव परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. हिसवळ परिसरात मोकाट कुत्र्यासोबत आता लांडग्याचादेखील मोठ्या प्रमाणात उपद्रव वाढला आहे. यामुळे नागरिकांना असणारा धोका लक्षात घेत वन विभागाने लांडग्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच वन विभागाच्चे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी उपजिल्हा रुग्णालयात जावून जखमींची भेट घेत त्यांची विचारपूस केली. मनमाडपासून जवळ हिसवळ बुद्रुक गाव आहे. आज सकाळी मीना आहेर (वय-45), सुनीता पवार (वय 35), जगन आहेर (वय 65) आणि मोहन सोळसे (वय 30) हे चार जण शेतात जात असताना दबा धरून बसलेल्या लांडग्यांने त्यांच्यावर हल्ला केला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे या चौघांनी आरडाओरडा केला. त्यांचा आवाज ऐकून गावातील तरुणांनी घटनास्थळी धाव घेतली. यामुळे लांडगा पळून गेला.
काही तरुणांनी त्याचा पाठलाग करून त्याला लाठ्या-काठ्यांनी मारण्याचा प्रयत्न केला मात्र, लांडगा जंगलात पसार झाला. यानंतर चारही जखमींना मनमाडच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत. घटनेची माहिती मिळताच वनाधिकारी डी.बी.बोरसे, डी.जी.सुर्यवंशी, सी.इ.भुजबळ, अशोक सोनावणे यांनी उपजिल्हा रुग्णालयात भेट देऊन जखमींची विचारपूस केली.
मनमाडसह नांदगाव तालुक्यात वनविभागाचे मोठे जंगल असून त्यात हरीण, मोर, ससे, लांडगे यासह इतर वन्यप्राणी आहेत. यामुळे गावात येऊन लांडग्यांने लोकांवर हल्ला केल्याची या भागात ही पहिलीच घटना मानली जात आहे.
इतर बातम्या –
VIDEO : Nashik| लासलगावात काँग्रेसच्या वतीनं कृषी विधेयकाची होळी करत आंदोलन pic.twitter.com/mFdTpWMaOW
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 31, 2020
(A wolf attack in Manmad four seriously injured)