मुंबई : सोशल मीडियावर वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी अभिनेता एजाज खानला (Actor Ajaz Khan arrest) मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून धार्मिक तेढ निर्माण होईल, असं वक्तव्य केल्याप्रकरणी एजाज विरोधात खार पोलिसांनी कलम 153 (अ), 117, 121, 117, 188, 501 आणि 502 (2) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे (Actor Ajaz Khan arrest).
एजाज खानने गुरुवारी फेसबुक लाईव्ह केलं होतं. यावेळी त्याने धार्मिक तेढ निर्माण होईल, असं वक्तव्य केलं होतं. त्याच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर अनेकांनी एजाजला अटक करावी, अशी मागणी केली होती. सोशल मीडीयावर ‘#अरेस्ट एजाज खान’ असा हॅशटॅग ट्रेंड झाला होता. त्यानंतर शनिवारी (18 मार्च) संध्याकाळी मुंबई पोलिसांनी एजाजला अटक केली. एजाजने याअगोदरही अनेकदा अशाप्रकारचे वादग्रस्त वक्तव्य केले आहेत.
कोण आहे एजाज खान?
‘बिग बॉस’मध्ये झळकलेला एजाज खान अनेक वेळा वादांच्या भोवऱ्यात सापडला आहे. त्याने तुरुंगवारीचाही अनुभव गाठीशी घेतलेला आहे. शारीरिक आणि लैंगिक अत्याचाराचे आरोप एजाजवर आहेत. टिकटॉक व्हिडीओच्या माध्यमातून धार्मिक तेढ पसरवल्याच्या आरोपातून त्याने तुरुंगवारी भोगली आहे.
‘रक्त चरित्र’, ‘अल्लाह के बंदे’ हे त्याचे सिनेमे विशेष गाजले. ‘रहे तेरा आशीर्वाद’, ‘कहानी हमारे महाभारत की’ यांसारख्या काही टीव्ही मालिकाही एजाज खानने केल्या आहेत. एजाज खान कायम वादात अडकणारा अभिनेता आहे. विशेष म्हणजे नुकत्याच सहा महिन्यांपूर्वी पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत त्याने अपक्ष निवडणूक लढवली होती. मात्र, त्याचा पराभव झाला होता.
हेही वाचा :
धारावीत कोरोना रुग्णांची शंभरी पार, माटुंगा लेबर कॅम्पमधील चौघांना लागण
मुंबईत एका दिवसात 184 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह, राज्यात कुठे किती नवे रुग्ण?