मावळ (पुणे) : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार हे मावळ लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून निवडणूक लढणार असल्याचा अंदाज वर्तवला जात असताना, या वृत्ताला दुजोरा देणारी घटना काल घडली. अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांनीमावळ मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेतल्या.
यावेळी पार्थ पवार यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेतर्फे चालवल्या जाणाऱ्या जलशुद्धीकरण केंद्राला पार्थ पवार यांनी गुपचूप भेट देऊन पाहणी केली. तसेच, शहरातील काही महाविद्यालयांबाहेर जाऊन पार्त पवार यांनी तरुण विद्यार्थ्याशी संवादही साधला. पार्थ पवार यांच्या या दौऱ्याबाबत पक्षाकडून कमालीची गुप्तता बाळगण्यात आली होती.
मावळ लोकसभा : पार्थ पवारांच्या नुसत्या नावाने भल्याभल्यांची सपशेल माघार
दरम्यान यावेळी पार्थ पवार यांनी पिंपरी शहराला पाणी कसं वितरित होते आणि पुढील 20 वर्षांसाठी पाणी पुरवठ्याचं काय नियोजन आहे, याची माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयालाही भेट दिली आणि दुपारच्या वेळेत विद्यार्थ्यांशी संवाद साधत स्वत:ची ओळख करुन दिली.
मावळ लोकसभा मतदारसंघाची रचना आणि सद्यस्थिती
मावळ लोकसभा मतदारसंघ पुणे आणि रायगड अशा दोन जिल्ह्यात विभागला गेला आहे. पुण्यातील तीन विधानसभा मतदारसंघ आणि रायगडमध्ये तीन विधानसभा मतदारसंघांचा मिळून मावळ लोकसभा मतदारसंघ बनला आहे.
पिंपरी चिंचवड आणि रायगड जिल्ह्यातील सहा मतदार संघाचा मावळ लोकसभा मतदार संघ बनलाय. त्यामुळे साहजिकच इथल्या समस्याही वेगळ्या आहेत. रायगड हा कोकणातला भाग आहे, त्यामुळे कोकणातल्या ज्या समस्या आहेत, त्याच समस्या इथल्या लोकांना आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये राहणाऱ्या लोकांच्या समस्या वेगळ्याच आहेत.
शिवसेनेचा बालेकिल्ल्याला आता पार्थ पवारांचं आव्हान?
मावळ लोकसभा मतदारसंघावर शिवसेनेचा भगवा गेल्या 10 वर्षीपासून फडकत आहे. यावेळी मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उडी घेतलेली पहायला मिळत आहे. अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार हे या मतदारसंघामधून लढण्याची शक्यता आहे. पिंपरी चिंचवड शहरामधील राजकारणात पार्थ पवार सक्रीय झाल्याचे समोर आले आहे. दस्तुरखुद्द अजित पवार यांचे पुत्र मावळ लोकसभा मतदारसंघात उतरणार म्हणल्यावर मावळमधील बहुतांश दिगग्ज उमेदवारांनी आपली तलवार आधीच म्यान केलेली दिसत आहे. पार्थ पवार म्हणजेच पर्यायाने अजित पवार यांच्यासोबत लढत करण्यासाठी पिंपरी चिंचवड भाजप अध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप असतील किंवा अन्य पक्षांचे उमेदवार असतील यांनी सपशेल माघार घेतलेली दिसत आहे. पार्थ पवार यांच्या रूपाने अजित पवार यांना अंगावर घेणे जड जाणार या उद्देशाने यांनी आपली तलवार म्यान केलेली दिसत आहे.
संबंधित बातम्या
धनंजय मुंडे म्हणाले, उठ पार्था तुझ्याशिवाय पर्याय नाही, आता पार्थ पवार म्हणतात……
लोकसभेसाठी पार्थ पवारसह 21 जणांची यादी, राष्ट्रवादी म्हणते…
राष्ट्रवादीचा अंतर्गत सर्व्हे, लोकसभेच्या ‘या’ 10 जागा जिंकण्याची खात्री
कोण पार्थ पवार? मी नाही ओळखत, पुढचा खासदार मीच : श्रीरंग बारणे