जयदत्त क्षीरसागर यांनी राष्ट्रवादी सोडल्याने पक्षाचं मोठं नुकसान : अजित पवार

| Updated on: May 22, 2019 | 4:49 PM

पुणे : जयदत्त क्षीरसागर यांनी त्यांच्या कौटुंबिक वादामुळे राष्ट्रवादी सोडली. विधानसभा डोळ्या समोर ठेवून ते गेले आहेत. मात्र त्यांनी राष्ट्रवादी सोडल्याने पक्षाचं मोठं नुकसान झालं आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी व्यक्त केली. ते टीव्ही 9 मराठीशी बोलत होते. जयदत्त क्षीरसागर यांच्या घरात वाद होता. त्यांच्याऐवजी पुतणे संदीप क्षीरसागर यांना तिकीट मिळेल […]

जयदत्त क्षीरसागर यांनी राष्ट्रवादी सोडल्याने पक्षाचं मोठं नुकसान : अजित पवार
Follow us on

पुणे : जयदत्त क्षीरसागर यांनी त्यांच्या कौटुंबिक वादामुळे राष्ट्रवादी सोडली. विधानसभा डोळ्या समोर ठेवून ते गेले आहेत. मात्र त्यांनी राष्ट्रवादी सोडल्याने पक्षाचं मोठं नुकसान झालं आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी व्यक्त केली. ते टीव्ही 9 मराठीशी बोलत होते. जयदत्त क्षीरसागर यांच्या घरात वाद होता. त्यांच्याऐवजी पुतणे संदीप क्षीरसागर यांना तिकीट मिळेल असं त्यांना वाटलं असावं. आता जागा वाटपात ती जागा शिवसेनेला जाईल म्हणून ते सेनेत गेले. कदाचित त्यांना मंत्रीपदही मिळेल, असं अजित पवार म्हणाले.

जयदत्त क्षीरसागर यांनी राष्ट्रवादी सोडल्याने बीड मध्ये झालेले नुकसान अधिक काम करुन भरू काढू, असं त्यांनी सांगितलं.

एक्झिट पोलवर प्रतिक्रिया

‘मी काही ज्योतिष नाही किंवा पोपटलाही विचारलं नाही’, अशी मिश्किल टीपणी अजित पवार यांनी एक्झिट पोलवर व्यक्त केली.

“एक्झिट पोलसारखे निकाल येतील असे वाटत नाही. मागच्या वेळी मोदी लाट हा ‘अंडर करंट’ कुणालाही कळला नाही. ना भाजपला ना आम्हाला ना मीडियाला. यावेळी काय अंडरकरंट काय ते मला कळलं असतं तर………मी काही ज्योतिषी नाही किंवा मीपोपटलाही विचारलं नाही किती जागा येतील म्हणून” असं अजित पवार म्हणाले.

जयदत्त क्षीरसागर आज शिवसेनेत

राष्ट्रवादी काँग्रेसचे बीड जिल्ह्यातील वरिष्ठ नेते आणि माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी आज (22 मे) शिवसेनेत प्रवेश करत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून जयदत्त क्षीरसागर राष्ट्रवादीत नाराज होते. शिवसेना-भाजपच्या व्यासपीठावर उपस्थित राहून, त्यांनी अनेकदा जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती. अखेर त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थिती शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. त्याआधी क्षीरसागर यांनी विधानसभा अध्यक्षांकडे आमदारकीचा राजीनामाही सुपूर्द केला. त्यावेळी त्यांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसला राम राम ठोकण्यामागचे कारणही सांगितले.

कोण आहेत जयदत्त क्षीरसागर?

जयदत्त क्षीरसागर हे बीडमधून तीन वेळा खासदार राहिलेल्या केसरबाई क्षीरसागर यांचे चिरंजीव आहेत. जयदत्त क्षीरसागर हे काँग्रेसमध्ये होते. नंतर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत ते राष्ट्रवादीत आले. राष्ट्रवादीत एक ओबीसी चेहरा आणि भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या तोडीस तोड म्हणून राष्ट्रवादीने त्यांना मंत्रिमंडळात अनेकदा संधी दिली. देशासह राज्यात भाजपची लाट असताना बीड जिल्ह्यातून ते राष्ट्रवादीकडून विधानसभा निवडणूक विजयी झाले होते. जिल्ह्यात दमदार यंत्रणा असणारे नेते म्हणून त्यांची ओळख आहे. जयदत्त क्षीरसागर यांच्याकडे सर्वात जास्त शिक्षण संस्था आहेत. बीड, धारूर, माजलगाव आणि शिरूर तालुक्यात जयदत्त क्षीरसागर यांचा मोठा प्रभाव आहे. सध्या कृषी उत्पन्न बाजार समिती, बीड नगरपालिका, पंचायत समिती आणि स्थानिक स्वराज्य संस्था क्षीरसागर यांच्या ताब्यात आहेत.

संबंधित बातम्या 

जयदत्त क्षीरसागर यांनी ‘राष्ट्रवादी’ सोडण्याचं कारण सांगितलं!  

निकालाच्या आदल्या दिवशी राष्ट्रवादीत भूकंप, जयदत्त क्षीरसागर यांचा शिवसेनेत प्रवेश