अर्णव गोस्वामींच्या अडचणीत वाढ; पोलीस कोठडीसाठी अलिबाग पोलिसांची सेशन्स कोर्टात धाव

| Updated on: Nov 05, 2020 | 12:03 PM

पत्रकार अर्णव गोस्वामींना ( Arnab Goswami) मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतरही अलिबाग पोलिसांनी (alibaug Police ) हार मानलेली दिसत नाही.

अर्णव गोस्वामींच्या अडचणीत वाढ; पोलीस कोठडीसाठी अलिबाग पोलिसांची सेशन्स कोर्टात धाव
Follow us on

रायगड: पत्रकार अर्णव गोस्वामींना ( Arnab Goswami) मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतरही अलिबाग पोलिसांनी (alibaug Police ) हार मानलेली दिसत नाही. अर्णवला पोलीस कोठडी मिळावी म्हणून पोलिसांनी आता सेशन्स कोर्टात धाव घेतली आहे. तर, दुसरीकडे जामीन मिळावा म्हणून अर्णव यांच्या वकिलांकडून मुंबई उच्च न्यायालयात अर्ज करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्यामुळे अर्णव यांना जामीन मिळणार की पोलीस कोठडी मिळणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. (alibaug Police seeks police custody for Arnab Goswami)

अन्वय नाईक आत्महत्याप्रकरणी काल अर्णव गोस्वामी यांना अटक केल्यानंतर त्यांना मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले होते. यावेळी त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर आज पुन्हा अलिबाग पोलिसांनी सत्र न्यायालयात धाव घेऊन अर्णव यांच्या पोलीस कोठडीची मागणी केली आहे. त्यावर आज किंवा उद्या सुनावणी होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे अर्णव यांच्या वकिलांनी त्याच्या जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव घेण्याच्या हालचाली सुरू केल्याचं सूत्रांनी सांगितलं.

दरम्यान, इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी अर्णव गोस्वामी यांना काल सकाळी मुंबई आणि रायगड पोलिसांच्या संयुक्त पथकाने अटक केली होती. यानंतर अर्णव गोस्वामी यांना अलिबाग येथे आणून त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. तेव्हापासून अर्णव यांच्या प्रकरणाची सुनावणी सुरु होती. यादरम्यान अर्णव गोस्वामी यांना रुग्णालयात नेऊन त्यांची वैद्यकीय तपासणीही करण्यात आली.

अर्णव गोस्वामी यांनी दुपारच्या सत्रात अलिबाग पोलिसांनी आपल्याला मारहाण केल्याचे आरोप केले होते. यावेळी त्यांनी माझ्या हाताला आणि पाठीला दुखापत झाल्याचेही अर्णव गोस्वामी यांनी म्हटले होते. मात्र, न्यायालयाने व्हिडीओ क्लीप आणि वैद्यकीय चाचणीचा अहवाल ग्राह्य धरत अर्णव गोस्वामी यांचे हे आरोप फेटाळून लावले.

याशिवाय, पोलिसांकडून अर्णव गोस्वामी यांची पत्नी आणि मुलाविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरकारी कामात अडथळा आणल्याचा या दोघांवर आरोप ठेवण्यात आला आहे. आज सकाळी रायगड पोलिसांची टीम अर्णवच्या घरी त्याला अटक करण्यासाठी आली होती. त्यावेळी अर्णवला अटक करत असताना त्याची पत्नी आणि मुलाने पोलिसांना अडवण्याचा प्रयत्न केला. त्याला घेऊन जाऊ देत नव्हते. अर्णवला घेऊन जाण्यास त्यांनी मज्जाव केल्याने त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (alibaug Police seeks police custody for Arnab Goswami)

 

संबंधित बातम्या: 

अर्णव हा भाजपचा प्रवक्ता म्हणूनच भाजप रस्त्यावर; संजय राऊतांचा टोला

मोठी बातमी: अर्णव गोस्वामी यांची 14 दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत रवानगी

मोठी बातमी: पोलिसांनी मारहाण केल्याचा अर्णव गोस्वामींचा दावा कोर्टाने फेटाळला

(alibaug Police seeks police custody for Arnab Goswami)