फिजी (Fiji) : फिजीमध्ये मोठ्या प्रमाणात भारतीय लोकसंख्या असल्यामुळे तिथे दिवाळी हा सण मोठ्या थाटामाटात साजरा होत आहे. तिथे दिवाळीला सार्वजनिक सुट्टीही आहे. या प्रकाशाच्या उत्सवात आकर्षक रोषणाईसह उत्तम कार्यक्रमांचं आयोजनही असतं. लोक एकमेकांना गिफ्ट देत आहेत. भारताप्रमाणे दिवाळीमध्ये सर्व शाळा व महाविद्यालयंही बंद आहेत.
इंडोनेशिया (Indonesia) : इंडोनेशियात भारतीय लोकसंख्या जास्त नसली तरीही दिवाळी हा इथला मोठा उत्सव आहे. या आनंदाच्या उत्सवात भारताप्रमाणे जवळपास सर्वच संस्कृती इंडोनेशियातही पाळली जाते.
मलेशिया (Malaysia) : मलेशियात भारताप्रमाणेच दिवाळीला 'हरी दिवाळी' असं म्हणतात. इथे सर्व विधी आणि संस्कृती मात्र वेळगी आहे. मलेशियात फटाके विक्रीवर बंदी असल्याने ते भेटवस्तू, मिठाई आणि शुभेच्छा देत दिवळीचा आनंद घेतात.
मॉरिशस (Mauritius ) : मॉरिशसमध्ये 50 टक्के हिंदू नागरिक आहेत. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण इथे मोठ्या उत्सवात दिवाळी साजरी होते. इतकंच नाही तर शाळांनाही सुट्टी असते.
नेपाळ (Nepal) : नेपाळमध्ये दिवाळी तिहार म्हणून ओळखली जाते. इथेही या खास सणाचा उत्साह असतो. नेपाळची सीमा भारताला जोडून असल्यानं दिवाळीत तिथे भारताप्रणाणेच साजरी होते. घरं सजवण्यासाठी ते एकमेकांना भेटवस्तू देणं आणि लक्ष्मीची उपासना करणं ही तिथे प्रथा आहे. नेपाळीमध्ये दिवाळी हा दशमीनंतरचा दुसरा सर्वात मोठा सण आहे.
श्रीलंका (Sri Lanka) : श्रीलंकेतही हिंदूंची संख्या मोठी आहे. त्यामुळे इथं दिवाळी मोठ्या थाटामाटात साजरी होते. दिवाळीमागे असणाऱ्या कथांमध्येही श्रीलंकेचा उल्लेख आहे.
कॅनडा (Canada) : कॅनडामध्ये मोठ्या संख्येने पंजाबी भाषिक स्थायिक आहेत. त्यामुळे कॅनडाला 'मिनी पंजाब' असंही म्हणतात. इतकंच नाही तर कॅनेडियन संसदेतली तिसरी अधिकृत भाषा ही पंजाबीच आहे.
सिंगापूर (Singapore) : भारतानंतर दिवाळीचा जर कुठे उत्साह असतो तर तो सिंगापूरमध्ये. इथं दिवाळीची सजावट, रांगोळी आणि प्रकाशाचा उत्सव साजरा केला जातो.
यूनाइटेड किंगडम (United Kingdom) : यूकेच्या अनेक शहरांमध्ये, खासकरून बर्मिंघम आणि लीसेस्टरमध्ये भारतीयांचा मोठा वर्ग आहे, जो दिवाळी साजरी करतो.
त्रिनिदाद आणि टोबॅगो (Trinidad and Tobago) : तुम्हाला आश्चर्य वाटेल पण कॅरिबियन बेट त्रिनिदाद आणि टोबॅगोमध्ये फक्त दिवाळीच नाही तर रामलीलादेखील रंगवली जाते.