तिरुअनंतपुरम : केरळमध्ये एका कोरोनाबाधित महिलेवर बलात्कार करण्यात आला आहे (Rape on Corona patient in Keral). ही धक्कादायक घटना केरळमधील पाठनमथिट्टा जिल्ह्यात घडली. या घटनेने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. अॅम्बुलन्स चालकानेच बलात्कार केल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे. पोलिसांनी अॅम्बुलन्स चालकाला अटक केली आहे (Rape on Corona patient in Keral).
पीडित महिलेला कोरोनाची लागण झाल्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यासाठी अॅम्बुलन्समधून नेण्यात येत होते. यावेळी अॅम्बुलन्स चालकाला निर्जन स्थळ दिसताच गाडी थांबवून बलात्कार केला, असा आरोप पीडित महिलेने केला आहे.
पीडित महिला रुग्णालयात पोहोचताच तिने घडलेला घटनाक्रम रुग्णालय कर्मचाऱ्यांना सांगितला. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलीसही तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी अॅम्बुलन्स चालकाला अटक केली.
“अॅम्बुलन्स चालकाला अटक करण्यात आली आहे. अॅम्बुलन्स चालकाची पहिल्यापासूनच गुन्हेगारी पार्श्वभूमीचा आहे. अलप्पुझा जिल्ह्यात राहणाऱ्या या चालकावर 2019 मध्ये हत्येचा गुन्हा दाखल आहे”, अशी माहिती पठानमथिट्टा जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक के. जी. सायमन यांनी दिली.
संबंधित बातम्या :
जेलरला बंदूक दाखवून पळालेला जळगावचा कुख्यात आरोपी बोईसरमध्ये जेरबंद
कोरोना काळात रेशनच्या तांदळाचा काळाबाजार, नवी मुंबईतून थेट दक्षिण आफ्रिकेत निर्यात