Jhund Teaser : नागराज मंजुळे दिग्दर्शित बिग बींच्या ‘झुंड’चा टीझर लाँच

| Updated on: Jan 21, 2020 | 12:00 PM

सैराट सिनेमामुळे घराघरात पोहोचलेला मराठमोळा दिग्दर्शक नागराज मंजुळे झुंड या सिनेमाचं दिग्दर्शन करत आहे. नागराजचा बॉलिवूडमधील हा पहिला सिनेमा आहे.

Jhund Teaser : नागराज मंजुळे दिग्दर्शित बिग बींच्या झुंडचा टीझर लाँच
Follow us on

मुंबई : नागराज मंजुळे दिग्दर्शित, ‘बिग बी’ अमिताभ बच्चन यांची मुख्य भूमिका असलेल्या बहुप्रतीक्षित ‘झुंड’ चित्रपटाचा टीझर लाँच झाला आहे. अभिनेता अभिषेक बच्चनने ट्विटरवरुन झुंडचा टीझर शेअर (Nagraj Manjule Jhund Movie Teaser Launch) केला आहे.

सैराट सिनेमामुळे घराघरात पोहोचलेला मराठमोळा दिग्दर्शक नागराज मंजुळे झुंड या सिनेमाचं दिग्दर्शन करत आहे. नागराजचा बॉलिवूडमधील हा पहिला सिनेमा आहे.

अमिताभ बच्चन यांनी कालच (20 जानेवारी) झुंड चित्रपटाचं पोस्टर शेअर केलं होतं. त्यानंतर अभिषेकने झुंड चित्रपटाचा टीझर शेअर केला आहे. अल्पावधीतच टीझरला प्रेक्षकांची वाहवा मिळवत असून सोशल मीडियावर अनेक जणांनी शेअर केला आहे.

बिग बी अमिताभ बच्चन हे एका क्रीडा प्रशिक्षकाची भूमिका साकारत आहेत. झोपडीत राहणाऱ्या मुलांना निवृत्त फुटबॉल क्रीडा शिक्षक विजय बारसे भेटतात आणि त्यांचं आयुष्य बदलून टाकतात, अशी या सिनेमाची कथा आहे. सत्यकथेवर आधारित हा सिनेमा आहे.

नागराज मंजुळेने या सिनेमाची स्क्रीप्ट लिहिण्यासाठी सुमारे दोन वर्ष वेळ घेतला. बिग बी अमिताभ बच्चन यांना नजरेसमोर ठेवूनच नागराजने ही स्क्रीप्ट लिहिली.

ज्या विजय बारसेंवर झुंड हा सिनेमा आधारित आहे, त्यांनी अनेक मुलांचं आयुष्य बदलून टाकलं. विजय बारसे एका कॉलेजमध्ये क्रीडा प्रशिक्षक होते. निवृत्तीनंतर त्यांनी झोपडपट्टीतील मुलांना फुटबॉलचं प्रशिक्षण दिलं.

Nagraj Manjule Jhund Movie Teaser Launch