मला ठार मारण्याचा अमोल चौधरींचा कट : अनिल गोटे

| Updated on: Jul 05, 2019 | 4:57 PM

सुनिल काळे, मुंबई, विशाल ठाकूर धुळे: “मला ठार मारण्याचा कट रचला होता, त्याचे पुरावे मी धुळे जिल्हा पोलीस प्रमुखांना दिले होते”, असा गौप्यस्फोट भाजप आमदार अनिल गोटे यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेत केला. यावेळी अनिल गोटे यांनी अमोल चौधरी नावाच्या व्यक्तीचं नाव घेऊन थेट आरोप केला. अनिल गोटे म्हणाले, “मला ठार मारण्याचा कट रचला गेला. त्याचे पुरावे […]

मला ठार मारण्याचा अमोल चौधरींचा कट : अनिल गोटे
Follow us on

सुनिल काळे, मुंबई, विशाल ठाकूर धुळे: “मला ठार मारण्याचा कट रचला होता, त्याचे पुरावे मी धुळे जिल्हा पोलीस प्रमुखांना दिले होते”, असा गौप्यस्फोट भाजप आमदार अनिल गोटे यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेत केला. यावेळी अनिल गोटे यांनी अमोल चौधरी नावाच्या व्यक्तीचं नाव घेऊन थेट आरोप केला.

अनिल गोटे म्हणाले, “मला ठार मारण्याचा कट रचला गेला. त्याचे पुरावे एसपींना दिले. पण कारवाई झाली नाही. एक आमदार सुरक्षित नसेल, तर आपण कुठल्या दिशेने जात आहोत. ज्यांनी माझ्या हत्येची सुपारी दिली, तो अमोल चौधरी आहे एका नगरसेविकाचा मुलगा आहे”
यावेळी अनिल गोटे यांनी धुळे महापालिका निवडणुकीवरुनही भाजपवर हल्लाबोल केला. धुळ्यात भाजपने 62 पैकी 57 उमेदवार उभे केले आहेत. त्यापैकी 27 उमेदवार गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत, असा आरोप अनिल गोटे यांनी केला.

57 पैकी 28 उमेदवार ज्यांचा भाजपशी संबंध नाही, ते सर्व गँगस्टर आहेत. त्याची संपूर्ण यादी मी मुख्यमंत्र्यांना दिली आहे, असंही अनिल गोटे म्हणाले.

ज्यांनी माझ्या हत्येची सुपारी दिली, तो अमोल चौधरी आहे एका नगरसेविकाचा मुलगा आहे. मला मारण्याबाबतची ऑडिओ क्लिप एसपींना दिली आहे, पण कारवाई झाली नाही, असा दावा गोटेंनी केला.

कोण आहेत अमोल चौधरी?

अमोल चौधरी ऊर्फ दाऊ  हे धुळे शहराच्या भाजप नगरसेविका प्रतिभा चौधरी यांचे सुपुत्र आहेत.

प्रतिभा चौधरी आधी अनिल गोटे गटात होत्या, आता केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे गटात आहेत.

अमोल चौधरी हे व्यावसायिक आहेत, सध्या त्यांच्याकडे टोल नाक्याचं कंत्राट  आहे.

अमोल चौधरी यांचं स्पष्टीकरण

दरम्यान, अनिल गोटे यांनी सोशल मीडियावरील ज्या ऑडिओ क्लिपचा दाखला दिला आहे, ती ऑडिओ क्लिप बनावट आहे, त्याचा माझ्याशी काहीही संबंध नाही, असा दावा अमोल चौधरींनी केला आहे.

धुळे महापालिका निवडणुकीत भाजपमध्ये उभी फूट

दरम्यान, धुळे महानगरपालिकेसाठी 09 डिसेंबरला मतदान होत आहे. मात्र त्यापूर्वीच भाजपमध्ये उभी फूट पडली आहे. भाजप आमदार अनिल गोटे आणि केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यामध्ये भाजप विभागली आहे. भाजपचे नाराज आमदार अनिल गोटे हे धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपसाठी डोकेदुखी ठरणार आहेत. भाजपमधीलच एक गट म्हणजेच स्वाभिमानी भाजप आणि स्वतःचा पक्ष लोकसंग्रामच्या माध्यमातून ते 74 उमेदवार मैदानात उतरवणार आहेत. या गटाकडून (स्वाभिमानी भाजप+लोकसंग्राम) अनिल गोटे यांच्या पत्नी हेमा गोटे या महापौरपदाच्या उमेदवार असतील.

संबंधित बातम्या

अनिल गोटे भाजपमधील एक गट फोडून स्वतः नेतृत्त्व करणार

या दोन अटींवर आमदार अनिल गोटेंचा राजीनामा मागे

अनिल गोटे भाजपची वाट लावणार, 7 पानी पत्र लिहून पैशाचा व्यवहार जाहीर

भाजप दुटप्पी, राजीनामा देतोय : आमदार अनिल गोटे   

अनिल गोटे भाजपची वाट लावणार, 7 पानी पत्र लिहून पैशाचा व्यवहार जाहीर

भाजप दुटप्पी, राजीनामा देतोय : आमदार अनिल गोटे

महापौरपदाचा उमेदवार मीच: आमदार अनिल गोटे 

भाजपच्या अनिल गोटेंनी दानवे, महाजनांची सभा उधळली