देशातील टॉप 3 स्वच्छ स्थानकांमध्ये मुंबईच्या ‘या’ स्थानकांचा समावेश

| Updated on: Oct 02, 2019 | 4:02 PM

देशपातळीवरील स्वच्छ रेल्वे स्थानक सर्वेक्षणात (Railway clean survey)  उपनगरातील तीन स्थानकं सर्वाधिक स्वच्छ असल्याचे समोर आलं आहे.

देशातील टॉप 3 स्वच्छ स्थानकांमध्ये मुंबईच्या या स्थानकांचा समावेश
Follow us on

नवी दिल्ली : देशपातळीवरील स्वच्छ रेल्वे स्थानक सर्वेक्षणात (Railway clean survey)  उपनगरातील तीन स्थानकं सर्वाधिक स्वच्छ असल्याचे समोर आलं आहे. यामध्ये मुंबईतील अंधेरी, विरार आणि नायगाव स्थानकांचा समावेश आहे. एकूण 109 उपनगरीय रेल्वे स्थानकांच्या सर्वेक्षणातून (Railway clean survey) या तीन स्थानकांची निवड करण्यात आली आहे.

रेल्वेकडून स्वच्छ भारत अभियान हा उपक्रम प्रत्येक रेल्वे स्थानकावर राबवला जातो. गांधी जयंतीच्या निमित्ताने आज रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्या उपस्थितित देशातील सर्वाधिक स्वच्छ असलेल्या स्थानकांची घोषणा करण्यात आली. यामध्ये राजस्थानच्या तीन स्थानकांची निवड करण्यात आली असून उपनगरीय रेल्वेमध्ये मुंबईच्या तीन स्थानकांनी अव्वल तीनमध्ये निवड केली आहे.

रेल्वेकडून 2016 पासून देशातली सर्व स्थानकांचे ऑडिट आणि स्वच्छता रँकिंग करण्यात येते. हे ऑडिट एका खासगी संस्थेद्वारे करण्यात येते. गेल्यावर्षी 407 स्थानकांचा सर्वे करण्यात आला होता. यावर्षी एकूण 720 स्थानकांचे सर्वेक्षण करण्यात आले होते आणि पहिल्यांदाच उपनगरीय रेल्वे स्टेशनचाही यामध्ये सहभाग होता.

“भारतीय रेल्वेचे महात्मा गांधी यांच्यासोबत एक अतूट नाते आहे. गांधीजींनी नेहमीच स्वच्छतेला महत्त्व दिले आहे. हा विचार करुन रेल्वेने स्वच्छता मिशनवर काम करण्यास सुरुवात केली. प्लास्टिक बंदी, बायो टॉयलेटसारख्या सुविधा रेल्वेला स्वच्छ आणि हायजेनिक बनवत आहे”, असं ट्वीट करत पियुष गोयल म्हणाले.

दरवर्षी हा सर्वे करण्यात येतो. मात्र यंदा पहिल्यांदाचा या सर्वेमध्ये उपनगरीय रेल्वेचा समावेश करण्यात आला होता. रेल्वेचे एकूण तीन भाग आहेत. ज्यामध्ये उत्तर पश्चिम रेल्वे, दक्षिण पूर्व मध्य आणि पूर्व मध्य रेल्वे असे तीन क्षेत्रात रेल्वेचे विभाजन केलेले आहे.