मुंबई : परिवहन मंत्री अनिल परब आणि एसटी कर्मचारी संघटनेत एक महत्वपूर्ण बैठक पार पडली आहे, त्यानंतर परबांनी काही मोठ्या घोषणा केल्या आहेत. विलिनीकरणाच्या मुद्दा त्रिसदस्यीय समिती जो अहवाल देईल तो आम्हा दोघांनाही मान्य असेल असे परबांनी पुन्हा सांगितले आहे. तसेच त्यांनी आमच्याकडे मागण्या केल्या होत्या. त्यानुसार शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे आम्हाला पगार मिळावा ही त्यांची मागणी होती.आम्ही जी मूळ पगारात वाढ करत त्यांना चांगल्या स्थानी नेऊन ठेवलं आहे, असेही परब म्हणाले आहेत. तसेच संपाचा आज 54 वा दिवस आहे, हे प्रकरण न्यायालयात गेले आहे. न्यायलयाने संप करू नेय, कामावर हजर व्हा असे बजावले होते, असेही ते म्हणाले आहेत.
कामवर हजर झाल्यास कारवाई मागे घेणार
एसटी कर्मचारी संघटनेची दुसरी मागणी होती की, ज्या कर्मचाऱ्यांवर कारवाई झाली होती. त्यांच्यावरील कारवाई कामगार कामावर आल्यानंतर मागे घ्यावी. त्यावर कामगार कामावर आले आणि डेपो चालू झाले तर आम्ही कारवाई मागे घेऊ, अशी घोषणा परब यांनी केली आहे. फक्त ज्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल झाले आहेत त्यावर कारदेशीर कारवाई पूर्ण करुनच मागे घेऊ, असंही त्यांनी बजाबले आहे.
आत्महत्या केलेल्या कर्मचाऱ्यांची प्रकरणे तपासू
त्याचबरोबर वेळेवर पगार मिळाला. 10 तारखेच्या आत पगार व्हावा ती मागमी आम्ही आधीच मान्य केली आहे. अशीही माहिती त्यांनी दिली. यासोबत त्यांच्या ज्या आर्थिक मागण्या होत्या त्यावर चर्चा करण्याची मागणी आम्ही मान्य केली. आत्महत्या केलेल्या कर्मचाऱ्यांची प्रकरणं आम्ही तपासू, त्यांच्या कुटुंबियांना नोकरी मिळावी हा मुद्दा आम्ही महामंडळासमोर ठेवू आणि तो मान्य करु, असेही परब म्हणाले आहेत. मात्र अजय गुजर जरी बैठकीला हजर असले तरी काही संघटना आणि एसटी कर्मचाऱ्यांनी संप कायम ठेवला आहे, त्यामुळे संपात सध्या फूट पडल्याचेही दिसून येत आहे.