मुंबई : दरवर्षी 6 डिसेंबर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 64 व्या महापरिनिर्वाण दिनी लाखोंच्या संख्येने अनुयायी दादरच्या चैत्यभूमीवर गर्दी करतात. मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी जनतेने अभिवादनासाठी मुंबईतील चैत्यभूमीवर गर्दी करू नये, असे आवाहन राज्य सरकारने केलं आहे. या पार्श्वभूमीवर यंदा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी प्रत्यक्ष चैत्यभूमीवर न येता पत्त्यावर पत्र पाठवून अभिवादन करा, असे आवाहन अनुयायांना करण्यात आलं आहे. विश्वशांती सामाजिक संस्थेच्या हा उपक्रम राबवला जात आहे. (Appeal to Send Letter on Dr Babasaheb Ambedkar Mahaparinirvan Day)
विशेष म्हणजे डिसेंबर महिना सुरु होण्यापूर्वीच चैत्यभूमीच्या या पत्त्यावर आतापर्यंत हजारो पत्रांचा पाऊस पडला आहे. चैत्यभूमीवर आतापर्यंत 3 हजार पेक्षा जास्त पत्र आले आहेत. वर्षानुवर्ष या दिवशी न चुकता चैत्यभूमीवर येणारे हजारो अनुयायी या वेळी कोरोनाच्या सावटामुळे मात्र येऊ शकणार नाहीत. त्यामुळे ही संकल्पना राबवण्यात येत आहे. मात्र, अनुयायी आपल्या मनातील भावना अनोख्या पद्धतीनं पत्राद्वारे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत पोहोचवत आहेत.
महाराष्ट्र आणि देशभरातून जे अनुयायी चैत्ययभूमीवर अभिवादनासाठी येऊ शकणार नाहीत. अशा चैत्यभूमीच्या पत्त्यावर हजारोंच्या संख्येनं पत्र येत आहेत. या पत्रांपैकी अनेक पत्रं लहान मुलांनी लिहिली आहेत. देशाच्या कानाकोपऱ्यातून वेगवेगळ्या भाषेतली पत्रं चैत्यभूमीच्या पत्त्यावर पाठवली जात आहेत. उर्दू, हिंदी, मराठी, इंग्रजी, तेलुगु अशा अनेक भाषांमधून ही पत्रं पाठवली जात आहेत.
विश्वशांती सामाजिक संस्थेच्या माध्ययमातून हा उपक्रम राबवला जात आहे. “ज्यांना कोरोना महामारीच्या काळात खेडेगाव, तालुका, जिल्हा आणि इतर राज्यातून चैत्यभूमी येथे येऊन आपल्या उद्धारकर्त्याला अभिवादन करता येणे शक्य नाही. त्यांच्यासाठी विश्वशांती सामाजिक संस्थेतर्फे हा उपक्रम राबवला जात आहे.
यासाठी कुटुंबातील प्रत्येक एका व्यक्तीने आपल्या नावे “अभिवादन महामानवाला” हा संदेश आणि स्वतःचे नाव तसेच स्वतःचा पत्ता लिहून एक पोस्टकार्ड चैत्यभूमी स्मारक दादर पश्चिम मुंबई 400028 या पत्त्यावर पाठवावे”
कोरोनाचा प्रादुर्भाव आणि चैत्यभूमीवरची गर्दी टाळण्यासाठी अनुयायांनी चैत्ययभूमीवर अभिवादनासाठी येऊ नये, त्याऐवजी अभिवादन करणारे पत्रं पाठवावे, असंही आवाहन प्रशासनाकडून केलं जातं आहे. (Appeal to Send Letter on Dr Babasaheb Ambedkar Mahaparinirvan Day)
संबंधित बातम्या :
शिवसेना आणि राष्ट्रवादीनेच नितीन राऊतांचा गेम केला: बबनराव लोणीकर
मराठा क्रांती मोर्चा आक्रमक, 1 डिसेंबरला निदर्शनं तर 8 डिसेंबरला लाँग मार्च