मोहम्मद पैगंबरांच्या व्यंगचित्राने प्रचंड त्रास, पण फ्रान्समधील हिंसाचार चुकीचा : असदुद्दीन ओवैसी

| Updated on: Nov 02, 2020 | 6:53 PM

फ्रान्समध्ये घडलेल्या हिंसाचारावर एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी प्रतिक्रिया दिली (Asaduddin Owaisi on France terror attack).

मोहम्मद पैगंबरांच्या व्यंगचित्राने प्रचंड त्रास, पण फ्रान्समधील हिंसाचार चुकीचा : असदुद्दीन ओवैसी
Follow us on

नवी दिल्ली : “मोहम्मद पैगंबर यांच्यावर फ्रान्समध्ये तयार केलेल्या व्यंगचित्राने प्रचंड त्रास झाला. मात्र, यावरुन घडलेल्या हिंसाचाराच्या घटना पूर्णपणे चुकीच्या आहेत”, अशी प्रतिक्रिया एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी एका वृत्तवाहिनीसोबत बोलताना दिली आहे (Asaduddin Owaisi on France terror attack).

“जिहादच्या नावाने निष्पापांचा बळी घेणारे खुनी आहेत. इस्लाम त्याचं समर्थन करत नाही. आपण जिथे राहतो त्या देशातील कायद्याचं पालन करायलाच हवं. तुम्ही कुणाचीही हत्या करु शकत नाही. तुम्हाला तसा अधिकार नाही”, असं ओवैसी म्हणाले (Asaduddin Owaisi on France terror attack).

नेमकं प्रकरण काय?

थोडक्यात हा वाद सांगायचा झाल्यास, फ्रान्समधील शार्ली हेब्दो या मासिकात 2015 मध्ये छापून आलेलं मोहम्मद पैगंबरांचं व्यंगचित्र, इतिहासाचे शिक्षक सॅम्युअल पॅटी यांनी विद्यार्थ्यांना दाखवलं. यावरुन या शिक्षाकाची 16 ऑक्टोबरला गळा चिरुन हत्या झाली. या हत्येनंतर संतापलेले राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी हा इस्लामी अतिरेक्यांचा हल्ला असल्याचं म्हटल्याने वाद आणखी उफाळला. हा वाद ताजा असतानाच, फ्रान्सच्या चर्चबाहेर एका चाकूधारी व्यक्तीने केलेल्या हल्ल्यात तिघांचा मृत्यू झाला. यामध्ये एका वृद्ध महिलेचाही समावेश होता. हा हल्लाही दहशतवाद्यानेच केल्याचा फ्रान्सचा दावा आहे.

नेमका वाद काय?

एका 18 वर्षाच्या तरुणाने 16 ऑक्टोबरला फ्रान्समधील इतिहासाचे शिक्षक सॅम्युएल पेची यांची गळा चिरुन हत्या केली होती. सॅम्युएल हे उत्तर-पूर्व पॅरिसमधील हायस्कूलमध्ये इतिहास हा विषय शिकवत होते. अभिव्यक्ती स्वातंत्र्य या विषयावरील चर्चेदरम्यान, सॅम्युएल यांनी शार्ली हेब्दो मासिकात 2015 मध्ये छापून आलेलं मोहम्मद पैगंबराचं व्यंगचित्र विद्यार्थ्यांना दाखवलं. इथेच घात झाला आणि कट्टरपंथीय तरुणाने सॅम्युएल यांचा गळाच चिरला.

राष्ट्राध्यक्षांचा संताप

सॅम्युएल पेची यांच्या हत्येनंतर फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी इस्लामी दहशतवादाच्या मुसक्या आवळण्याचा संकल्प व्यक्त केला होता. कट्टरतेला प्रोत्साहन देणाऱ्या मशिदी आणि संघटनांवर बंदी घालण्याची तयारी मॅक्रॉन यांनी बोलून दाखवली. मॅक्रॉन यांच्या याच वक्तव्याने इस्लाम राष्ट्रांमधून संताप व्यक्त होऊ लागला. जगातील अनेक राष्ट्रांमधून फ्रान्सचा निषेध तर केलाच पण त्यांच्या उत्पादनांवरही बहिष्काराचं आवाहन नागरिकांना करण्यात आलं.

इस्लाम राष्ट्रांमधील कतार, कुवेत, जॉर्डनमध्ये अनेक इस्लाम व्यापाऱ्यांनी, संघटनांनी फ्रान्सची उत्पादनचं हटवली. सीरिया, लिबिया, गाझा पट्टीसारख्या भागात फ्रान्सविरोधात संतापाची लाट उसळली.

संबंधित बातम्या :

‘फ्रान्सप्रमाणे भारतात देवी-देवतांचं वाईट कार्टून काढलं असतं तर त्यालाही मारलं असतं’, मुनव्वर राणांविरोधात गुन्हा दाखल