अशोक चव्हाण निष्क्रिय, मराठा आरक्षण उपसमितीवरून हकालपट्टी करा; मेटेंची राज्यपालांकडे मागणी

| Updated on: Nov 10, 2020 | 9:39 PM

मराठा आरक्षण उपसमितीच्या अध्यक्ष पदावरून अशोक चव्हाण यांची हकालपट्टी करण्याची वारंवार मागणी करूनही ती पूर्ण होत नसल्याने अखेर शिवसंग्राचे नेते विनायक मेटे यांनी आता हा प्रश्न राज्यपालांच्या दरबारात नेला आहे. (ashok chavan should be removed from maratha reservation sub-committee)

अशोक चव्हाण निष्क्रिय, मराठा आरक्षण उपसमितीवरून हकालपट्टी करा; मेटेंची राज्यपालांकडे मागणी
Follow us on

मुंबई: मराठा आरक्षण उपसमितीच्या अध्यक्ष पदावरून अशोक चव्हाण यांची हकालपट्टी करण्याची वारंवार मागणी करूनही ती पूर्ण होत नसल्याने अखेर शिवसंग्राचे नेते विनायक मेटे यांनी आता हा प्रश्न राज्यपालांच्या दरबारात नेला आहे. विनायक मेटे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी घेऊन त्यांनी या समितीवरून चव्हाणांना हटवण्याची मागणी केली आहे. (ashok chavan should be removed from maratha reservation sub-committee)

विनायक मेटे यांनी आज राजभवनावर जाऊन राज्यपालांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे कार्यकर्तेही होते. मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष म्हणून अशोक चव्हाण निष्क्रिय ठरले आहेत. त्यांच्या कार्यपद्धती विषयी मराठा समाजात संतापाचे वातावरण आहे. त्यामुळे त्यांना पदावर ठेवू नये, अशी मागणी मेटे यांनी राज्यपालांकडे केली. यावेळी त्यांनी चव्हाण यांच्या हकालपट्टीसाठी मातोश्रीवर मशाल मोर्चा काढण्यात आला होता, अशी माहितीही दिली.

शनिवारी आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांच्याशी मराठा आरक्षणावर चर्चा केली होती. आजही त्यांच्याशी चर्चा केली. मात्र, आरक्षणावर तोडगा निघेल असं वाटत नाही. त्यामुळे तुम्ही त्यात लक्ष घाला, अशी विनंतीही त्यांनी राज्यपालांना केली.

दरम्यान, “मराठा आंदोलकांना मी स्वत: जाऊन भेटलो आहे. त्यांचं निवेदन स्वीकारुन ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे देखील पाठवलं आहे. निवेदनात केलेल्या मागण्या अतिशय महत्त्वाच्या आहे. सरकार नक्कीच यासंदर्भात सकारात्मक विचार करेल, ज्यांना कुणाला राजकारण करायचे असेल त्यांनी ते करावं. सरकारला आरक्षणाचा प्रश्न सोडवायचा आहे. सरकार मराठा आरक्षणाबाबत प्रमाणिक आहे”, असं अनिल परब म्हणाले होते.

 

संबंधित बातम्या:

Headline | अशोक चव्हाणांना समितीतून हटवा – विनायक मेटे

 मशाल मार्च दडपण्याचा ठाकरे सरकारचा प्रयत्न, विनायक मेटेंचा सरकारवर घणाघात

(ashok chavan should be removed from maratha reservation sub-committee)