मुंबई : बॉलिवूड अभिनेता बॉबी देओल अभिनित ‘आश्रम चॅप्टर-2’ या वेब सीरीजमध्ये सनातन धर्माशी संबंधित धार्मिक भावना दुखावणारे दृश्य चित्रित केल्याचा आरोप करत दिवाणी कोर्टाच्या वकिलाने गुरुवारी जौनपूर न्यायालयात अर्ज दाखल केला (Ashram Chapter 2 Controversy). त्यानंतर त्यांनी अभिनेता बॉबी देओल (Bobby Deol) आणि दिग्दर्शक प्रकाश झा (Prakash Jha) यांच्या विरोधात स्थानिक न्यायालयात खटलाही दाखल केला आहे. जौनपूर दिवाणी कोर्टाचे वकील हिमांशु श्रीवास्तव यांनी गुरुवारी (12 नोव्हेंबर) अधिवक्ता उपेंद्र विक्रम सिंह यांच्यामार्फत न्यायालयात हा अर्ज दाखल केला आहे (Ashram Chapter 2 Controversy Application Filed against Prakash Jha and Bobby Deol in Jaunpur).
या अर्जात हिमांशू यांनी म्हटले की, ‘सनातन धर्मावर माझा खूप विश्वास आहे. लहानपणापासूनच आम्हाला आश्रम आणि पवित्र हिंदू ग्रंथ माहित आहे आणि आम्ही त्याबद्दल खूप ऐकले आहेत. आश्रम हे ऋषीमुनींचे पवित्र स्थान असल्याचे म्हटले जाते. सुसंघटित आश्रम संस्था हे भारतातील वैशिष्ट्य आहे. ‘आश्रम चॅप्टर-2’मध्ये निर्दोष लोकांना आश्रमावरील श्रद्धेच्या नावाखाली कसे गुंडाळले जाते, गुन्हेगारी आणि राजकारणाची युती कशी आहे, आश्रमांमध्ये व्यभिचार आणि मादक पदार्थांचा व्यापार इत्यादी कसे चालतात, हे दाखवले गेले आहे, जे चुकीचे आहे.’
#Aashram Chapter 1 ne paaya itna pyaar ki #AashramChapter2 ko mile ek se badhke ek yaar.
Thank you for the 5X love ? pic.twitter.com/jsvFKRDwun— MX Player (@MXPlayer) November 12, 2020
‘आश्रम चॅप्टर-2’ या वेब सीरीजमध्ये आश्रमाची काळीबाजू दाखवली गेली आहे. अभिनेता बॉबी देओल याने या वेब सीरीजमध्ये ‘काशीपूरचा बाबा निराला’ हे पात्र साकारले आहे. ‘आश्रम’ची कथा ड्रग्ज, बलात्कार, नरसंहार आणि राजकारणाभोवती फिरत आहे. मालिकेत सनातन धर्माच्या बाबांना ढोंगी, भोगी, गुन्हेगार दाखवून सनातन धर्माची बदनामी केली जात आहे.
केवळ धार्मिक भावना भडकवण्यासाठी या वेब सीरीजला ‘आश्रम’ असे नाव देण्यात आले आहे, असा आरोप हिमांशू यांनी केला आहे. तसेच, त्यांनी प्रकाश झा आणि बॉबी देओल यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे (Ashram Chapter 2 Controversy Application Filed against Prakash Jha and Bobby Deol in Jaunpur).
‘आश्रम’ या वेब सीरीजमध्ये बॉबी देओल मुख्य भूमिका साकारत आहे. त्याचे पात्र एका ढोंगी बाबाची कथा सांगणारे आहे. या वेब सीरीजच्या पहिल्या सीझनला प्रेक्षकांकडून उदंड प्रतिसाद मिळाला असला, तरी आता दुसऱ्या भागाच्या प्रदर्शनावर मात्र संकट कोसळले आहे. धार्मिक भावना दुखावल्याचे कारण देत, याआधीही वेब सीरीजवर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली होती. या वादादरम्यान, ‘प्रेक्षक याचा निर्णय घेतील’, असे मत ‘आश्रम’चे निर्माते प्रकाश झा यांनी व्यक्त केले होते.
(Ashram Chapter 2 Controversy Application Filed against Prakash Jha and Bobby Deol in Jaunpur)