वॉशिंग्टन : माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडेन यांच्या प्रचारासाठी नवा मार्ग स्वीकारला आहे. बराक ओबामा नागरिकांना फोन बँकिंग उपक्रमाद्वारे फोन करुन जो बायडेन यांचा प्रचार करत आहेत. बराक ओबामा यांनी असाच एक फोन अल्यास्सा या महिलेला फोन केला आणि तिच्या सोबत तिच्या आठ महिन्यांच्या बाळासोबतही थोडासा संवाद साधला.माजी राष्ट्राध्यक्षांचा फोन आल्याने अल्यास्सा भारावून गेल्या. (Barack Obama was urging everyone to vote for Joe Biden through phone call)
माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामांनी अल्यास्सा हिला फोन करुन जो बायडेन आणि कमला हॅरिस यांना मतदान करण्याचे आवाहन केले. ओबामांनी अल्यास्सा यांच्या आठ महिन्यांच्या बाळाशी संवाद साधला. ”हे जॅक्स, व्हॉट्स गोईंग ऑन, मॅन” असं त्यांनी विचारलं आणि अल्यास्सा यांना मतदान करण्याचं आवाहन करुन संवाद संपवला. यावेळी त्यांनी कुटुंबीय आणि मित्रांनाही मतदान करण्यास सांगावे, असं म्हटलं.
राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी शेवटच्या मिनिटापर्यंत विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि जो बायडेन यांनी प्रचार अभियान राबवले. रिपब्लिक पक्षाचे उमेदवार विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडेन यांच्यामध्ये लढत होत आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामादेखील मैदानात उतरल्याचे पाहायला मिळाले. बराक ओबामा यांनी ट्रम्प यांच्यावर प्रचारादरम्यान जोरदार टीकास्त्र सोडले.
You could be the difference between someone making it out to the polls or staying home. And many states could be decided by a handful of votes. Join me and make some calls for Joe in the last few days of this election: https://t.co/FZknijCx0E pic.twitter.com/XGUnAArRXW
— Barack Obama (@BarackObama) October 31, 2020
बराक ओबामा त्यांचे जुने सहकारी जो बायडेन यांच्यासाठी प्रचार अभियान राबवत आहेत. ओबांमांनी प्रचारादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कोरोना परिस्थिती व्यवस्थित हाताळली नसल्यावरुन जोरदार टीका केली. कोरोना संसर्गाच्या काळात ओबामांनी प्रचारासाठी सुरक्षित असा फोनद्वारे प्रचाराचा मार्ग स्वीकारला आहे. ते अमेरिकन नागरिकांना फोन करुन जो बायडेन यांच्यासाठी मत मागताना दिसत आहेत.
दरम्यान, अमेरिकेत प्रतिनिधी सभा (House of Representatives) आणि सिनेट मिळून काँग्रेस तयार होते. काँग्रेस अमेरिका सरकारची विधीमंडळ शाखा (legislative branch)आहे. प्रतिनिधी सभेमध्ये 438 आणि सिनेटमध्ये100 सदस्य असतात. एकूण 538 पैकी 270 मते मिळतील तो उमेदवार राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत विजयी होतो.
संबंधित बातम्या :
US Presidential Election 2020: ट्रम्प निवडणूक हरणार की जिंकणार? आज फैसला
US Election 2020: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीतील सर्वाधिक निर्णायक 10 मुद्दे
(Barack Obama was urging everyone to vote for Joe Biden through phone call)