आधार कार्डची कमाल, बीडचा हरवलेला मुलगा चार वर्षांनी परभणीत सापडला

| Updated on: Mar 02, 2020 | 5:14 PM

चार वर्षांपूर्वी ताटातूट झालेला मुलगा परत मिळाल्याने कुटुंबाच्या आनंदाला पारावार उरला (Missing Boy found with aadhar help) नाही.

आधार कार्डची कमाल, बीडचा हरवलेला मुलगा चार वर्षांनी परभणीत सापडला
Follow us on

बीड : परभणीच्या मानवत रेल्वे स्थानकावर पोलिसांना अत्यंत अशक्त स्थितीत असलेला एक मुलगा आढळून आला (Missing Boy found with aadhar help) होता. त्याची विचारपूस केली असता, त्याला काहीच आठवत नव्हते. त्यामुळे पोलिसांनी त्याला नळदुर्ग येथील ‘आपलं घर’ या बालसुधारगृहात त्याची रवानगी केली. त्यानंतर जेव्हा नवीन आधारकार्ड नोंदणीसाठी या मुलाचे ठसे घेण्यात आले. तेव्हा या मुलाचा मूळ शोध लागला आणि चार वर्षांपासून दुरावलेले आई-वडील त्याला (Missing Boy found with aadhar help) मिळाले.

बीड जिल्ह्यातील माजलगाव येथील मच्छिंद्र शिंदे यांचा मुलगा भीमराव हा चार वर्षांपूर्वी हरवला होता. आई वडिलांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला. पण तो कुठेही न सापडल्याने त्यांनी पोलिसांत धाव घेतली. पोलिसांनीही त्याचा सर्वत्र तपास केला. मात्र तो मुलगा सापडला नाही.

तो मुलगा परत भेटेल अशी आशा आई-वडिलांनी सोडली होती. मुलगा परत भेटले की नाही या चिंतेत असलेल्या आई-वडिलांना आधार कार्डने आधार देत ताटातूट झालेल्या आई-मुलाची भेट घडवली. यामुळे आधार कार्डचा असाही फायदा झाला आहे. चार वर्षांपूर्वी ताटातूट झालेला मुलगा परत मिळाल्याने कुटुंबाच्या आनंदाला पारावार उरला (Missing Boy found with aadhar help) नाही.

चार वर्षांपूर्वी माजलगाव येथून भीमराव मच्छिंद्र शिंदे मुलगा हरवला होता. उस्मानाबाद जिल्ह्यातील नळदुर्गजवळील अलियाबाद येथील “आपलं घर” या बाल आधारगृहाने आधार दिला. या ठिकाणचे अधिक्षक नरेश ठाकूर यांनी या मुलाचे नवीन आधार कार्ड काढण्यासाठी प्रयत्न केले. मात्र वेळोवेळी काही त्रुटी आढळल्यामुळे ठाकूर यांनी का याचा पाठपुरावा केला.

त्यानंतर त्यांनी भीमराव यास मुंबई येथील आधार कार्ड कार्यालयात घेऊन गेले. त्यावेळी याची चौकशी केली. तेव्हा भीमरावचे आधारकार्ड पूर्वीच काढलेले आहे असे समजले. त्या आधार कार्डवर सर्व माहिती मिळाल्यानंतर त्याचे आईवडील असल्याचा शोध लागला. सध्या भीमरावला त्याच्या कुटुंबियांकडे सोपवण्यात आले.

एखाद्या चित्रपटाला साजेशी अशीच कहाणी भीमरावच्या बाबतीत घडले. लहानपणी भीमरावचा आधारकार्ड काढला नसता तर कदाचित त्याचे आई-वडील अद्याप त्याला मिळालेच नसते. मात्र आधारकार्ड काढल्याने अखेर त्याला त्याचे कुटुंबीय मिळाले. त्यामुळे खऱ्या अर्थाने आधार कार्डचा फायदा भीमराव आणि त्याच्या कुटुंबाला झाला, असे म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

(Missing Boy found with aadhar help)