मुंबई : भाजपचे विधान परिषदेचे आमदार प्रसार लाड यांच्या गाडीचा आज (14 ऑगस्ट) भीषण अपघात झाला. हा अपघात मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर झाला. कामशेत बोगद्यानंतर टोल नाक्यजवळ एक किलोमीटरच्या अंतरावर हा अपघात घडला आहे. सुदैवाने या अपघातात प्रसाद लाड यांना कोणतीही इजा झाली नाही. ते सुखरुप आहेत. मात्र, या अपघातात त्यांच्या गाडीचं प्रचंड नुकसान झालं आहे (BJP MLA Prasad Lad car accident at Mumbai Pune Express Highway).
या दुर्घटनेनंतर प्रसाद लाड यांनी ट्विटरवर प्रतिक्रिया दिली. “अपघात झाल्याची बातमी खरी असली तरी गणपती बाप्पाच्या कृपेने मी, माझ्यासोबतचे पोलीस अधिकारी, माझे स्वीय सहाय्यक, गाडी ड्रायव्हर आम्ही सगळे सुखरुप आहोत. काहीही झालेलं नाही. गणपती बाप्पाच्या आशीर्वादामुळे एवढा मोठा अपघात होऊनही आम्हाला साधं खरचटलंही नाही”, असं प्रसाद लाड म्हणाले.
“माझी काळजी करणाऱ्या आणि काळजीपोटी फोन करणाऱ्या सर्वांना सांगू इच्छितो की, मी सुखरुप आहे. मी माझा अहमदनगरचा दौरा करण्यासाठी पुढे जात आहे. तरी आपण केलेल्या काळजीबद्दल धन्यवाद”, अशी प्रतिक्रिया प्रसाद लाड यांनी दिली (BJP MLA Prasad Lad car accident at Mumbai Pune Express Highway).
अपघात झाला हि बातमी जरी खरी असली तरी, श्री सिद्धिविनायकाच्या कृपेने मी सुखरूप आहे , आपण सर्वजण काळजी करू नका !
आपल्या सर्वांचा मनापासून आभारी आहे !!!
– आ प्रसाद लाड@BJP4Maharashtra @bjp4mumbai @BJP4India pic.twitter.com/DTpJHMSbHr
— Prasad Lad (@PrasadLadInd) August 14, 2020