औरंगाबादः नागपूर ते मुंबई या बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे (Samruddhi High way) काम अनेक जिल्ह्यांमध्ये वेगाने सुरु आहे. राज्यातील 12 जिल्ह्यांतून जाणारा हा मार्ग महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी बुस्टर डोस समजला जातोय. नागपूर ते मुंबई अशा 700 किलोमीटर अंतरापैकी 112 किमी लांबीचा रस्ता औरंगाबादमधून जातो. त्याची रुंदी 120 मीटर असेल. याच मार्गावरील पोखरी शिवारात सध्या काळ्या पाषाणाचा खडक फोडून मोठा बोगदा तयार करण्यात आला आहे. हर्सूल येथील सावंगीच्या पूर्वेला असलेल्या पोखरी गावाच्या शिवारात असे दोन बोगदे आहेत. काळ्या पाषाणातील हा डोंगर अससल्याने येथे बोगदा करणे शक्य झाल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.
सावंगीजवळील दोन बोगदेसावंगीजवळील काळा पाषाण पोखरून हा बोगदा तयार करण्यात आला आहे. दै. दिव्यमराठी वृत्तपत्रातील यासंबंधीच्या वृत्तानुसार, या बोगद्यात ग्राउटिंग आणि गनायटिंग अशी केमिकल ट्रिटमेंट केलेली आहे. या ट्रीटमेंटमुळे ढिसाळ झालेला खडक मजबूत तर होतोच, शिवाय वॉटरप्रूफिंगदेखील केली जाते. या दोन्ही बोगद्यात विद्युतीकरण केले जाणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळाचे मुख्य अभियंता बी.पी. साळुंके यांनी दिली. या बोगद्याची लांबी 301 फूट असून 17.5 मीटर रुंदी आहे. तर बोगद्याची उंची 17.5 फूट एवढी आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपूर ते मुंबई या एकूण 701 किलोमीटर रस्त्यावर 26 टोलनाके असून त्याची वसुली करण्यासाठी ऑपरेटर नियुक्त केले जाणार आहेत. 26 टोलनाक्यांवर सुमारे 624 कर्मचारी असतील. कार, जीप, व्हॅन किंवा हलक्या वाहनांसाठी प्रतिकिलोमीटर 1.73 रुपये टोल आकारला जाणार आहे. नागपूर ते मुंबई असा कारने प्रवास केला तर महामार्गावर सुमारे 1 हजार 213 टोल द्यावा लागेल. त्यामुळे सामान्य माणसांना या रस्त्यावरून प्रवास करणे अजिताबच परवडणारे नाही.
इतर बातम्या-