मुंबई : आयकर रिटर्न भरण्याची शेवटची तारीख जवळ आली आहे. 31 डिसेंबर 2020 पर्यंत रिटर्न न भरणा्यांना दंड भरावा लागू शकतो. म्हणूनच, देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँकेने आपल्या ग्राहकांसाठी विशेष सेवा सुरू केली आहे. एसबीआयने (SBI) प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, YONO अॅपद्वारे कोणत्याही अडचणीशिवाय टॅक्स भरू शकता. (can pay taxes without any hassle through SBI’s Yono app)
कोरोना व्हायरलमुळे इन्कम टॅक्स रिटर्न अंतिम मुदत 31 जुलै ते 31 ऑक्टोबर 2020 पर्यंत वाढविण्यात आली होती. नंतर ती 30 नोव्हेंबर आणि नंतर 31 डिसेंबर 2020 पर्यंत वाढविण्यात आली आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून माहिती देताना एसबीआयने सांगितले आहे की, जर आयकर भरण्यास काही अडचण येत असेल तर ते YONO अॅपची मदत तुम्ही घेऊ शकता, यासाठी तुम्हाला YONO अॅपवर लॉग इन करावे लागेल.
यानंतर आपल्याला शॉप आणि ऑडर्समध्ये जावे लागेल. मग टॅक्स आणि इन्वेस्टमेंटमध्ये जावे लागेल त्यानंतर पुढे येईल की, Tax2Win तिथे मग आपल्याला संपूर्ण माहिती मिळेल.
जर तुम्हाला हे सर्व करताना काही समस्या येत असेल तर तुम्ही या हेल्पलाइन क्रमांकावर 9660-99-66-55 कॉल करून माहिती मिळवू शकता.
संपूर्ण प्रक्रिया
आपल्याला www.incometaxindiaefiling.gov.in वर जावे लागेल. यानंतर यूजर आयडी (पॅन), संकेतशब्द, जन्मतारीख आणि कॅप्चा कोड टाकावा लागेल.
त्यानंतर ‘ई-फाईल’ (e-File) टॅबवर जा आणि या लिंक Income Tax Return क्लिक करा. प्रथम आपल्याला कोणता आयटीआर (ITR) भरायचा ते निवडावे लागेल.
मूळ रिटर्न भरत असल्यास ‘Original’ टॅबवर क्लिक करा. सुधारित रिटर्न भरत असल्यास ‘Revised Return’ क्लिक करा.
यानंतर, Prepare and Submit Online ओपन करा आणि Continue वर क्लिक करा आणि तिथे विचारलेली संपूर्ण माहिती भरा आणि ते सर्व सेव्ह करा जर हे सर्व करत असताना त्याची वेळ संपली तर ती सर्व माहिती तुम्हाला परत भरावी लागेल यासाठी माहिती भरत असतानाच सेव्ह करत राहा.
यामध्ये तुम्हाला गुंतवणूकीची सर्व माहिती, आरोग्य आणि जीवन विम्याची माहिती भरावी लागेल. सर्व माहिती भरल्यानंतर, शेवटी Verification चे पेज येईल. तुम्हाला शक्य असेल तर लगेच वेरिफाय करा किंवा 120 दिवसांच्या आत तुम्ही केव्हाही वेरिफाय करून घेऊ शकता. त्यानंतर, Previw and submit जाऊन सबमिट करा.
वेरिफिकेशन करायला विसरू नका
आयटीआर (ITR) अपलोड झाल्यानंतर 120 दिवसांच्या आत वेरिफाय करणे जाणे आहे.
(I) आधार ओटीपीद्वारे
(II) नेट बँकिंगद्वारे ई-फाईल खात्यात लॉग इन करून
(IV) आयटीआर-व्ही ची स्वाक्षरी केलेली प्रत बेंगळुरूला पाठवा.
संबंधित बातम्या :
1 जानेवारीपासून GST चा नियम बदलणार, 45000 व्यापाऱ्यांवर होणार परिणाम
(can pay taxes without any hassle through SBI’s Yono app)