पुणे : कोरोनाच्या संकंटात अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी (Chakan MIDC) केंद्र सरकारने देशातील उद्योगधंद्यांना परवानगी दिली आहे. मात्र, उद्योगधंदे सुरु करण्यासाठी सरकारने काही नियम आणि अटी लागू केल्या आहेत. केंद्र सरकारचे सर्व नियम आणि अटी पाळून चाकण औद्योगिक वसाहतीमध्ये 800 पेक्षा जास्त लहान-मोठ्या कंपन्या सुरु होणार आहेत. या कंपन्यांमध्ये आज (5 मे) साफसफाईचे काम सुरु करण्यात आलं आहे (Chakan MIDC).
“कंपनी व्यवस्थापनाकडून कामगारांच्या आरोग्याविषयी सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत. कंपनीतील कर्मचाऱ्यांमध्ये कोणत्याही प्रकारे कोरोनाचा संसर्ग होणार नाही, याची काळजी घेतली जात आहे”, अशी माहिती चाकण औद्योगिक वसाहतमधील एका कंपनी व्यवस्थापकाने ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना दिली.
केंद्र सरकारने देशातील सर्व कंपन्यांना एकूण कर्मचाऱ्यांपैकी फक्त 30 टक्के कर्मचाऱ्यांना कामावर ठेवून समूह संसर्ग होणार नाही, याची काळजी घेण्याची सूचना केली आहे. “कंपन्यांनी केंद्र सरकारच्या नियमांचे काटेकोर पालन करावे. नियमांचे उल्लंघन झाल्यास कडक कारवाई करण्यात येईल”, असादेखील इशारा सरकारकडून देण्यात आला आहे.
दरम्यान, केंद्र सरकारने देशातील सर्व कंपन्यांना काही सूचना दिल्या आहेत. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या सचिव पुण्य सलिला श्रीवास्तव यांनी आजच्या पत्रकार परिषदेत या सूचनांविषयी माहिती दिली.
केंद्र सरकारकडून कंपन्यांना देण्यात आलेल्या सूचना:
संबंधित बातम्या :
Pune Corona : पुण्यात 24 तासात 99 नवे रुग्ण, 8 ते 10 दिवसात रुग्णांची संख्या वाढण्याची भीती
EXCLUSIVE : आरामात चौथा उमेदवार निवडून आणणार : देवेंद्र फडणवीस