चंद्रपूर : तंत्रज्ञानाच्या डिजीटल युगात अनेक गोष्टी मोबाईलवरच होऊ लागल्या आहेत. त्यासाठी अनेक नवनवे फिचर असलेले महागडे मोबाईलही बाजारात आले आहेत. या मोबाईलच्या उपयोगासोबतच मोबाईल हरवल्यास होणारं नुकसान देखील मोठं आहे. त्यामुळेच त्याची सुरक्षितता हा देखील महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळेच चंद्रपूर पोलिसांनी जिल्ह्यातील चोरीला गेलेले आणि हरवलेले मोबाईल शोधण्याचं काम केलं आहे. 2019 या वर्षात 2 हजारपेक्षा अधिक हरवलेल्या मोबाईलचा शोध घेऊन जप्त केले आहेत (Chandrapur Police find out Missing and Stolen mobile). तसेच मोबाईलच्या मुळ मालकांपर्यंत पोहचवले आहेत.
विशेष म्हणजे हरवलेले बहुतांश मोबाईल महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडून जप्त करण्यात आले आहेत. चौकशीत काही महाविद्यालयीने तरुणांनी संबंधित मोबाईल रस्त्यावर सापडल्याची माहिती दिली आहे. तर काहींनी ओएलएक्सवरुन (OLX) विकत घेतल्याचं सांगितलं. चंद्रपूर पोलिसांनी एका विशेष कार्यक्रमात 214 मोबाईल मूळ मालकांना परत केले आहेत. चंद्रपूरमध्ये हरवलेले अथवा चोरीला गेलेले मोबाईल तब्बल 10 जिल्हे आणि 10 राज्यात चंद्रपूरकरांचे मोबाईल्स कार्यरत असल्याची माहिती उघड झाली आहे.
चंद्रपूर पोलिसांनी आज (1 जुलै) एक कार्यक्रम आयोजित करत हरविलेले मोबाईल त्यांच्या मूळ मालकांना परत केले. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी या कार्यक्रमात मूळ मालकांना हे महागडे मोबाईल परत केले. यानंतर ग्राहकांना झालेला आनंद पाहण्यासारखा होता. एकट्या 2019 या एका वर्षात चंद्रपूर जिल्ह्यात 2100 पेक्षा अधिक हरवलेले मोबाईल पोलिसांनी शोधून काढले. यातील 214 व्यक्तींना आज हे मोबाईल सुपूर्द करण्यात आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एकूण 10 जिल्हे आणि 10 राज्यात चंद्रपूरकरांचे हरवलेले मोबाईल कार्यरत आहेत. त्याहून धक्कादायक बाब म्हणजे हरविलेले बहुतांश मोबाईल महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडून जप्त करण्यात आले आहेत. त्यापैकी बहुतांश महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी हे रस्त्यावर सापडल्याची माहिती दिली. काही तरुणांनी olx या वेबसाईटवरुन संबंधित मोबाईल्स विकत घेतल्याची कबुली दिली. त्यामुळे आगामी काळात अशा पद्धतीने ऑनलाईन वस्तू विकत घेताना ग्राहकांनी सावधानता बाळगावी असं आवाहन चंद्रपूर पोलिसांनी केले आहेत.
हेही वाचा :
sanitizer | दारु न मिळाल्याने सॅनिटायजर प्यायला, सफाई कर्मचाऱ्याचा मृत्यू
Pune Firing : पुण्यात पूर्ववैमनस्यातून पोलीस पाटलावर गोळीबार
अहमदनगरमध्ये विहिरीत उडी मारुन पतीची आत्महत्या, पतीला वाचवताना पत्नीचाही मृत्यू
Chandrapur Police find out Missing and Stolen mobile