मुंबई : हिंदू धर्मात श्री गणेशाला विषेश महत्त्व आहे. कोणतीही पूजा करण्याच्या आधी गणेशाची पूजा केली जाते. म्हणूनच की काय त्याला विघ्नहर्ता असेही म्हणतात. गणपतीची पूजा केली नाही तर कोणत्याही देवाची पूजा देखील अपूर्ण आहे.गणपतीची मनोभावे पूजा केल्यास भक्तांची सर्व दुःखे, संकटे दूर होतात. गणेशाची पूजा केल्याशिवाय कोणतेही शुभ कार्य पूर्ण होत नाही. त्यामुळेच बुधवारी गणेशाच्या पूजेला विशेष महत्त्व आहे. या दिवशी विधीपूर्वक पूजा केल्यास गणपती लवकर प्रसन्न होतो.
गणेश मंत्र
ॐ ग्लौम गौरी पुत्र, वक्रतुंड, गणपति गुरू गणेश।
ग्लौम गणपति, ऋदि्ध पति, सिदि्ध पति। मेरे कर दूर क्लेश।।
ज्योतिषशास्त्रानुसार बुधवारी सकाळी पूजा केल्यानंतर या पवित्र मंत्राचा १०८ वेळा जप केल्याने आयुष्यातील सर्व संकटे दूर होतात. पण या मंत्राचा जप करताना संपूर्ण सात्त्विकता ठेवावी लागते. तसेच मांसाहार, दारू, राग यांपासून दूर राहावे, हे विसरुन चालणार नाही.
गणेश गायत्री मंत्र
ॐ एकदन्ताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो बुदि्ध प्रचोदयात।।
बुधवारी या गणेशाच्या या मंत्राचा 108 वेळा जप केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात. गणपतीला लवकर प्रसन्न करण्यासाठी या मंत्राचा जप करावा, असे देखील सांगितले जाते. गणेश गायत्री मंत्राचा 11 दिवस जप केल्यास जीवनातील सर्व समस्या दूर होतात.
गणेश कुबेर मंत्र
ॐ नमो गणपतये कुबेर येकद्रिको फट् स्वाहा।
बुधवारी जर गणेश कुबेर मंत्राचा जप केला तर जीवनातील पैशाशी संबंधित सर्व त्रासांपासून मुक्ती मिळते. या मंत्राचा नियमित जप केल्याने व्यक्तीला कर्जापासून मुक्ती देखील मिळू शकते. त्याच प्रमाणे संपत्तीचे नवीन स्रोतही निर्माण होतात.
टीप- येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, यासाठी कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांचे हित लक्षात घेऊन ते येथे मांडले आहे.
संबंधित बातम्या :
Shagun-Apshagun | उंदीर-चिचुंद्री घरात असणे शुभ की अशुभ, जाणून घ्या…
PHOTO | Vastu Tips : अभ्यासात एकाग्रता वाढवण्यासाठी स्टडी रुममध्ये लावा ‘ही’ 4 झाडे
Kaal Sarp Dosh : कुंडलीतील काल सर्प दोष दूर करण्यासाठी हे महाउपाय करा…