मुंबई: भाजपचे बंडखोर नेते एकनाथ खडसे उद्या शुक्रवारी राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. त्यामुळे त्यांना कोणतं मंत्रिपद मिळणार? याबाबत वेगवेगळे कयास लढवले जात आहेत. याबाबत राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना विचारले असता खडसेंना कोणतं मंत्रिपद द्याययचं याचा निर्णय राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारच निर्णय घेतील, असं भुजबळ म्हणाले. (chhagan bhujbal on eknath khadse portfolio in thackeray government)
टीव्ही9 मराठीशी बोलताना छगन भुजबळ यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. एकनाथ खडसे हे राष्ट्रवादीत येत आहेत. त्यांचं स्वागतच आहे. आम्ही सर्व त्यांचं आनंदानं स्वागत करणार आहोत, असं छगन भुजबळ म्हणाले. खडसेंना कोणतं मंत्रिपद देण्यात येणार आहे? त्यांच्यासाठी कोणत्या मंत्र्याचा राजीनामा घेण्यात येणार आहे?, असा सवाल भुजबळ यांना करण्यात आला. त्यावर खडसेंना कोणतं मंत्रिपद द्यायचं याबाबत पवारच निर्णय घेतील, असं सांगत भुजबळ यांनी अधिक बोलण्यास नकार दिला.
दरम्यान, एकनाथ खडसे यांना कृषी मंत्रिपद मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. खडसे यांनीही कृषी मंत्रिपदासाठी पवारांकडे आग्रह धरला होता, अशी चर्चा आहे. मात्र, खडसे यांचा ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळातील समावेश निश्चित असला तरी त्यांना नेमकं कोणतं मंत्रिपद मिळणार याबाबत कोणतीही अधिकृत माहिती अद्याप देण्यात आलेली नाही.
खडसे यांनी काल दुपारी पत्रकार परिषद घेऊन भाजपचा त्याग करत असल्याचं जाहीर केलं होतं. याच पत्रकार परिषदेत त्यांनी शुक्रवारी दुपारी 2 वाजता राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचंही घोषित केलं होतं. त्याशिवाय त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या छळाला कंटाळूनच भाजपला सोडचिठ्ठी देत असल्याचंही म्हटलं होतं. (chhagan bhujbal on eknath khadse portfolio in thackeray government)
संबंधित बातम्या:
काँग्रेसचा एल्गार, नागपुरात राष्ट्रवादीशी आघाडी नाही, स्वबळाचा नारा
जनाची नाही तर मनाची बाळगा, दसरा मेळाव्यावरुन भाजपची शिवसेनेवर टीका
(chhagan bhujbal on eknath khadse portfolio in thackeray government)