मुंबई: अभिनेता सुशांतसिंह राजपूतने आत्महत्या केली हे मुंबई पोलिसांनी दोन दिवसात सांगितले. तेच सांगायला सीबीआयने दोन महिने घेतले, अशी खोचक टीका राज्याचे अन्न व नागरी पूरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केली. (chhagan bhujbal on sushant singh rajput case)
प्रसारमाध्यमांशी बोलताना छगन भुजबळ यांनी सुशांतप्रकरणावरून भाजपला धारेवर धरले. मुंबई पोलिसांनी दहशतवाद्यांच्या गोळ्या छातीवर झेलल्या. त्याच पोलिसांवर काही लोकांनी अविश्वास दाखवला. सुशांतप्रकरणात मुंबई पोलिसांना बदनाम करण्यात आलं. मुख्यमंत्र्यांनाही बदनाम केलं गेलं. एवढंच नव्हे तर मुंबईची तुलना पाकिस्तानशीही करण्यात आली. पण मुंबई पोलिसांनी प्रामाणिकपणे तपास करत सुशांतने आत्महत्याच केल्याचं दोन दिवसांतच सांगितलं होतं. सीबीआयला मात्र त्यासाठी दोन महिने घ्यावे लागले, असा टोला भुजबळ यांनी त्यांच्या खास शैलीत लगावला.
काही लोकांना सुशांत गेल्याचं दु:ख नव्हतंच. त्यांना केवळ राजकारण करायचं होतं. शिवसेनेच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकारला बदनाम करणं हा त्यामागचा एकमेव हेतू होता, अशी टीकाही त्यांनी भाजपचं नाव न घेता केली.
सोलापूर येथील शिवसेना नेते महेश कोठे हे त्यांच्या समर्थकांसह राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा आहे. त्यावरही भुजबळांनी भाष्य केलं. लोकल स्तरावरचं राजकारण वेगळं असतं. पण स्थानिक पातळीवर अटीतटीचं राजाकरण होऊ नये यासाठी प्रयत्न असावेत. अशा घटनांमुळे सरकारवर काहीही परिणाम होणार नाही, असंही त्यांनी सांगितलं. (chhagan bhujbal on sushant singh rajput case)
सुशांतप्रकरण भाजपकडून हाइप; अमेरिकेच्या विद्यापीठाचा दावा: अनिल देशमुख https://t.co/uaIwSq5UzO#anildeshmukh #bjp #SushantConspiracyExposed #SushantAIIMSReport #SushantSingRajputDeathCase @AnilDeshmukhNCP
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 6, 2020
संबंधित बातम्या:
सुशांतची पवना, मुंबईतील प्रॉपर्टी हडपण्याचा कुटुंबाचा डाव होता का?; शिवसेनेकडून चौकशीची मागणी
आता सुशांतप्रकरणाचा अहवाल अंध भक्त नाकारणार काय?, शिवसेनेचा सवाल
(chhagan bhujbal on sushant singh rajput case)