बिहारमध्ये प्रचार करण्यापेक्षा स्वत:च्या राज्यासाठी आधी काम करा : उद्धव ठाकरे

| Updated on: Oct 19, 2020 | 3:39 PM

"बिहारमध्ये प्रचार करण्यापेक्षा स्वत:च्या राज्यासाठी आधी काम करा", असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना केलं (CM Uddhav Thackeray on Devendra Fadnavis).

बिहारमध्ये प्रचार करण्यापेक्षा स्वत:च्या राज्यासाठी आधी काम करा : उद्धव ठाकरे
Follow us on

सोलापूर : “शेतकऱ्यांच्या मदतीवरुन राजकारणाचा चिखल कुणीही एकमेकांवर उडवू नये. विरोधी पक्षनेतेदेखील महाराष्ट्रातील जबाबदार नेते आहेत. जनतेला दिलासा देण्याचं काम आहे. केंद्र आणि राज्य सरकार काय करेल यापेक्षा ज्या राज्याचे तुम्ही आहात, त्यासाठी आधी काम करा. बिहारमध्ये प्रचार करण्यापेक्षा स्वत:च्या राज्यासाठी आधी काम करा”, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना केलं (CM Uddhav Thackeray on Devendra Fadnavis).

उद्धव ठाकरे यांनी आज (19 ऑक्टोबर) सोलापूरात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागांची पाहणी केली. नुकसानग्रस्त भागाच्या पाहणीनंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी पत्रकारांनी त्यांना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांबाबत केलेल्या टीप्पणीबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी प्रत्युत्तर दिलं (CM Uddhav Thackeray on Devendra Fadnavis).

देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना घराबाहेर पडण्याबाबत टीप्पणी केली होती. त्याबाबत उद्धव ठाकरे यांना प्रश्न विचारला असता त्यांनी फडणवीसांवर निशाणा साधला. “देवेंद्र फडणवीस दिल्लीत गेले तर पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील घराबाहेर पडतील. त्यांनी दिल्लीत जावं. असंही ते बिहारला जातच आहेत, दिल्लीतही जावं”, असं मिश्किल उत्तर उद्धव ठाकरे यांनी दिलं.

“शेतकऱ्यांसाठी तात्काळ मदतीची सुरुवात केलेली आहे. पण, केंद्र सरकार हे परदेशातील सरकार नाही. केंद्र सरकार हे पक्षाचं सरकार आहे. कदाचित ते पक्षाच्यादृष्टीने विचार करत असतील. पण केंद्र सरकार हे देशाचं सरकार आहे. पक्षपात न करता राज्यांची आणि देशाची काळजी घेणं हे केंद्र सरकारचं कर्तव्य आहे”, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

“शेतकऱ्याच्या डोळ्यात आज पाणी आहे, हे आज आपण सर्व बघत आहोत. त्याने काही बोलावं, काही मागावं, त्यापेक्षा त्याचं दु:ख ओळखून आम्हाला काहीतरी करण्याची गरज आहे, हे फार महत्त्वाचं आहे. ते आम्ही केल्याशिवाय राहणार”, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

“पंतप्रधान मोदींनी शुक्रवारी फोन केला. त्यामुळे आमची खात्री पटली जर आम्हाला काही गरज लागली तर आम्ही हक्काने त्यांच्याकडे मागू आणि ते नक्की दिल्याशिवाय राहणार नाहीत”, असा विश्वासदेखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.

संबंधित बातम्या :

केंद्र सरकार हे देशाचं सरकारं आहे परदेशातलं नव्हे, राज्यांची काळजी घेणे कर्तव्य- मुख्यमंत्री

मदत मागितली बिघडलं कुठं?; केंद्रातील सरकार हे परदेशातील सरकार नाही; मुख्यमंत्र्यांचा फडणवीसांना टोला