पुणे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुण्याच्या एक दिवसीय दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत कोरोना संदर्भात आढावा बैठक झाली. उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, भाजप खासदार गिरीश बापट, शिवसेना खासदार श्रीरंग बारणे, राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यासारखे लोकप्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते. (CM Uddhav Thackeray Pune Visit to review COVID19 condition in city)
पुणे शहर आणि पश्चिम महाराष्ट्रात कोरोनाच्या संसर्गासंदर्भात सुरु असलेल्या उपाययोजनांचा आढावा त्यांनी बैठकीत घेतला. आता मुख्यमंत्री विभागीय आयुक्त, पुणे जिल्हाधिकारी आणि आरोग्य विभागाचे अधिकारी यांच्याशी चर्चा करतील. उद्धव ठाकरे स्वतः गाडी चालवत सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास ‘मातोश्री’हून पुण्याला आले.
Live Update
2.30 pm : विभागीय आयुक्तालयात लोकप्रतिनिधींसोबत आयोजित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आढावा बैठक संपली, मुख्यमंत्री सर्किट हाऊसला रवाना
पुणे : विभागीय आयुक्तालयात लोकप्रतिनिधींसोबत आयोजित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आढावा बैठक संपली, मुख्यमंत्री सर्किट हाऊसला रवाना https://t.co/JD5viVpgTV pic.twitter.com/kBYRLCAxDx
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 30, 2020
12.30 pm : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुण्यात दाखल, कोरोना संदर्भात आढावा बैठकीला सुरुवात, अजित पवार, चंद्रकांत पाटील, गिरीश बापट, अमोल कोल्हे, मुरलीधर मोहोळ उपस्थित
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे पुणे येथे आगमन झाले. मा. मुख्यमंत्री आज कोरोना आजार प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अनुषंगाने लोकप्रतिनिधींसोबत तसेच प्रशासकीय यंत्रणेसमवेत आढावा बैठक घेणार आहेत. pic.twitter.com/zAbEfLFzlK
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) July 30, 2020
11.45 am : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुणे शहरात प्रवेश करणार, दुपारी 12.15 वाजता विभागीय आयुक्त कार्यालयात पोहचण्याची शक्यता, उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, भाजप खासदार गिरीश बापट, शिवसेना खासदार श्रीरंग बारणे बैठकीसाठी दाखल
9.30 am : उद्धव ठाकरे स्वतः गाडी चालवत सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास ‘मातोश्री’हून पुण्याला रवाना
VIDEO : उद्धव ठाकरेंच्या हातात स्टिअरिंग, मुख्यमंत्री मातोश्रीहून पुण्याकडे रवाना@CMOMaharashtra @PawarSpeaks @AjitPawarSpeaks #Mumbai #Pune pic.twitter.com/jzUY6EhefH
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 30, 2020
पुणे शहर आणि जिल्ह्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मुख्यमंत्री ससून किंवा नायडू यासारख्या एखाद्या रुग्णालयाला भेट देण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. स्मार्ट सिटी वॉररुममध्येही ते पाहणी करु शकतात. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुणे दौरा संपवून संध्याकाळी पाच वाजता मुंबईकडे येण्यास निघतील.
अजित पवार यांचा दौरा
उपमुख्यमंत्री अजित पवार विभागीय आयुक्त कार्यालयात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडणाऱ्या कोरोना लोकप्रतिनिधींच्या आढावा बैठकीला हजेरी लावणार आहेत. त्याचबरोबर 2.30 वाजता ते प्रशासनाच्या कोरोना प्रतिबंधक आढावा बैठकीला हजेरी लावणार आहेत.
Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर
दरम्यान, कोरोना आढावा बैठकीला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हजेरी लावणार आहेत. चंद्रकांत पाटील आणि मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे एकाच बैठकीला हजेरी लावणार असल्याने उत्सुकता वाढली आहे. यावेळी पाटील प्रश्नांचा भडीमार करण्याची शक्यता आहे.
भाजपचा तक्रारीचा पाढा
पुण्याचे पालकमंत्री अजित पवार दर आठवड्याला पुण्यात आढावा बैठक घेताना दिसतात. परंतु “मुख्यमंत्री ‘मातोश्री’बाहेर पडत नाहीत, राज्याच्या दौऱ्यावर जात नाहीत” अशी तक्रार भाजपकडून सातत्याने होत आहे. मुख्यमंत्र्यांचा पुणे दौरा हे उशिरा सुचलेले शहाणपण असल्याची बोचरी टीका पुण्याचे भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी केली होती. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या पुणे दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा : चंद्रकांत पाटलांच्या ‘त्या’ वक्तव्यानंतर देवेंद्र फडणवीसांची सारवासारव
पुण्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियोजन नीट होत आहे, मग अंमलबजावणी होताना काही अडचणी आहेत का? कोरोनाच्या प्रादुर्भाव रोखणे आणि मृत्यूदर कमी करणे यावर उद्धव ठाकरे लक्ष केंद्रित करु शकतात. पुण्याला निधी अपुरा पडत आहे का, याविषयीही ते विचारणा करण्याची शक्यता आहे. (CM Uddhav Thackeray Pune Visit to review COVID19 condition in city)